Amol Balwadkar | कोथरूड परिसरातील 150 गणेश मंडळाला अमोल बालवडकर यांनी भेट देत घेतले दर्शन; बालवाडकरांना गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून अभूतपूर्व प्रतिसाद (Video)

पुणे : Amol Balwadkar | शहरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. दरम्यान, कोथरूड परिसरातील (Kothrud Assembly) जवळपास दीडशे गणेश मंडळाला अमोल बालवडकर यांनी भेट देत दर्शन घेतले. यावेळी मंडळातील सभासद व सहकाऱ्यांसमवेत त्यांनी संवाद साधला. तसेच कोथरुड परिसरातील गणेश मंडळांच्या व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या समस्या जाणुन घेवुन त्या तातडीने सोडविण्याचे त्यांनी आश्वासित केले. यावेळी बालवडकर यांना गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने कोथरुड परिसरातील अखिल कलासगर मित्र मंडळ (चांदणी चौक, कोथरूड), माधवबाग सोसायटी मित्र मंडळ, श्री गणेश मित्र मंडळ (किश्किंदा नगर), शिवशक्ती मित्र मंडळ (किश्किंदा नगर), जय हनुमान मित्र मंडळ (रामबाग कॉलनी), राज मित्र मंडळ, बाल युवक मित्र मंडळ (पौड रोड), जय भारत मित्र मंडळ (हनुमान नगर), श्री कृष्ण मित्र मंडळ (हनुमान नगर), अष्टविनायक मित्र मंडळ, बाल मित्र मंडळ (हनुमान नगर) केळेवाडी, छोटा जवान मित्र मंडळ (केळेवाडी) येथे त्यांनी भेट देत बाप्पाचे दर्शन घेतले.
त्याचबरोबर बाल शिवाजी मित्र मंडळ (केळेवाडी), आदर्श मित्र मंडळ, त्रिमूर्ती मित्र मंडळ राजीव गांधी, एकता मित्र मंडळ, नवयुग मित्र मंडळ, सुवर्णयुग बाल तरुण मंडळ, हरी ओम मिञ मंडळ, बालाजी मित्र मंडळ, देशप्रेमी मित्र मंडळ, कुमार युवक मंडळ (कर्वे रोड), अखिल गणेशनगर मित्र मंडळ, गणेशनगर मित्र मंडळ (कर्वे रोड) कोथरूड, बाळ तरुण मंडळ (कर्वे रोड) कोथरूड, आनंदनगर पार्क मित्र मंडळ, अशा विविध मंडळांना व तेथील सभासदांना भेटी देत गणरायाची मनोभावे आरती करुन अमोल बालवडकर यांनी दर्शन घेतले.