Ajit Pawar On Dilip Mohite Patil | … तर खेड-आळंदीला लाल दिव्याची गाडी देतो, अजित पवारांचे आश्वासन; म्हणाले – ” चुकलो तर आमचं कान पकडून…”

Ajit Pawar (2)

पुणे : Ajit Pawar On Dilip Mohite Patil | विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटाने कंबर कसली आहे. बंड झाल्यानंतर दुरावलेला मतदार जोडण्याचे काम अजित पवारांकडून केले जात आहे. दरम्यान आज (दि.१२) उपमुख्यमंत्री अजित पवार खेड-आळंदी (Khed Alandi Assembly) दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी दिलीप मोहितेंना आमदार करा, खेड-आळंदीला लाल दिव्याची गाडी देतो, असे आश्वासन दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

अजित पवार म्हणाले, ” भावनेच्या भरात घेतलेला निर्णयाचा पश्चाताप करण्याची वेळ येते. त्यामुळं मी खेड-आळंदीच्या जनतेला सांगतो, भावनिक होऊन कोणता निर्णय घेऊ नका. काही दिवस आम्हाला द्या, चुकलो तर आमचं कान पकडून जाब विचारा. तुमचा तो अधिकार आहे. मात्र भावनिक होऊन काही वेगळा निर्णय घेऊ नका. तुमचा आशीर्वाद द्या, पाठिंबा द्या.”

ते पुढे म्हणाले,”महायुतीच्या जागा वाटपात (Mahayuti Seat Sharing Formula) खेड-आळंदीची जागा राष्ट्रवादीला सुटली तर पुन्हा एकदा दिलीप मोहिते पाटलांना (Dilip Mohite Patil) निवडून द्या. ग्रामपंचायत ते आमदारापर्यंत गाडी पोहचली आहे. आता दिव्यापर्यंत गाडी पोहचवण्यासाठी साथ द्या. कार्यसम्राट असणं अन आक्रमक असणं यात फरक आहे. दिलीप मोहिते पाटील हे आक्रमक आहेत. त्यांचा आक्रमक पणा त्यांच्या पत्नी कसा नियंत्रणात आणत असतील, हे खरंच कौतुकाची बाब आहे. म्हणून मी सुरेखा ताईंना मानतो “, असेही अजित पवार म्हणाले.