Maharashtra Assembly Election 2024 | शिवसेना शिंदे गटाच्या मतदारसंघावर अजित पवार गटाचा डोळा; महायुतीत जागावाटपावरून वादंग

कर्जत : Maharashtra Assembly Election 2024 | कर्जतच्या जागेवरून (Karjat Khalapur Assembly Constituency) महायुतीमध्ये (Mahayuti) अनेक वेळा वाद झाल्याचे समोर आले आहे. मात्र हा वाद आता पुन्हा चिघळण्याची शक्यता आहे. कारण कर्जतच्या जागेवर आता राष्ट्रवादीने डोळा ठेवला आहे. (Ajit Pawar NCP)
काल (दि.१०) पत्रकार परिषदेत स्वतः राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी या मतदारसंघात सुधाकर घारे इच्छुक आहेत, असं वक्तव्य केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे या जागेवरून स्वतः एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आता वरिष्ठ नेते निर्णय घेतील असं विधान करत तटकरे यांनी यावर भाष्य टाळलं होतं.
कर्जतमधून राष्ट्रवादीचे सुधाकर घारे (Sudhakar Ghare) हे इच्छुक आहेत आणि त्यांना सुनील तटकरे यांचे पाठबळ असल्याचा चर्चा सध्या रायगडच्या राजकीय वर्तुळात रंगलेल्या पहायला मिळतं आहेत. त्यामुळे तिथे शिंदे गटाचे (Shivsena Shinde Group) विद्यमान आमदार असलेले महेंद्र थोरवे (Mahendra Thorve) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
दूसरीकडे अलिबाग मुरुड मतदार संघात (Alibag Assembly Constituency) देखील भाजपचे दिलीप भोईर इच्छुक असल्याचे बोलले जातंय. त्यामुळे तिथे विद्यमान आमदार महेंद्र दळवी यांना देखील महायुतीतील या वादाला सामोरे जाण्याची शक्यता आहे.
आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांच्या श्रीवर्धन मतदार संघाचा (Shrivardhan Assembly Constituency) जर का महायुतीत सारं काही आलबेल झालं नाही. तर येणाऱ्या विधानसभेत आम्हीसुध्दा आमचा उमेदवार आदिती तटकरे यांच्या बालेकिल्ला असणाऱ्या श्रीवर्धन मतदार संघात उभा करू असा सूचक इशारा स्वतः शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी माणगाव मधील लोणेरे येथील एका कार्यक्रमात दिला होता.
हीच वेळ रायगड जिल्हयातील (Raigad) या मतदार संघातून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सुनील तटकरे यांच्या या विधानावरून आता थोरवे विरूद्ध घारे यांच्या वादातील मास्टर माईंड कोण हे लवकरच उघड होण्याची शक्यता आहे.