Vishrantwadi Pune Crime News | शासनाने अधिग्रहित केलेल्या जमिनीचा मोबदला मिळून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक; नितीन करीर यांची दाखविली ओळख

पुणे : Vishrantwadi Pune Crime News | शासनाने तलावासाठी जमीन अधिग्रहीत केली पण, तिचा मोबदला दिला नाही. सासर्यांचा मृत्यु झाला तरी तो मोबदला मिळाला नाही. तेव्हा मेहुण्याच्या सांगण्यावरुन त्यांनी मंत्रालयाल काम करुन देणारा शोधला. त्याने नितीन करीर यांची ओळख असल्याचे सांगून तब्बल १२ लाख ५० हजार रुपयांना गंडा घातला. (Cheating Fraud Case)
याबाबत विजय वाघ (वय ४५, रा. पिंपळेगुरव) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात (Vishrantwadi Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी धर्मपाल मनोहर लांजेवार Dharmapal Manohar Lanjewar (वय ५०), प्रिती धर्मपाल लांजेवार Priti Dharmapal Lanjewar (वय ४५, दोघे रा. नागपूर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे सासरे दगडु घोगरे यांची वडिलोपार्जित जमिनीपैकी काही जमीन शासनाने तलावासाठी अधिग्रहित केली. मात्र या जमिनीचा मोबदला सासर्यांना मिळाला नाही. त्यांनी शेवटपर्यंत त्यासाठी प्रयत्न केले. परंतु मोबदला मिळू शकला नाही. त्यांच्या निधनानंतर फिर्यादी यांचे मेहुणे बळवंत घोगरे यांनी मंत्रालयात ओळख असलेला कोणी असेल तर जो आपले काम करुन देईल, अशी विचारणा केली. मित्रांच्या ओळखीतून धर्मपाल लांजेवार याच्याशी त्यांची २०२१मध्ये ओळख झाली होती. धर्मपाल याने आपली मुख्य सचिव नितीन करीर यांच्याशी ओळख आहे. तुमचे काम दोन महिन्यात करुन देतो, असे सांगितले. पण, त्यासाठी अगोदर पैसे द्यावे लागतील, असे सांगितले. त्यानुसार त्याने वेळोवेळी ५० हजार रुपये, साडेचार लाख रुपये, दीड लाख रुपये घेतले. २० डिसेबर २०२३ रोजी ६ लाख रुपये घेतले. एक वर्ष होऊन गेले तरी काम करुन दिले नाही. तेव्हा त्यांनी दिलेले १२ लाख ४५ हजार रुपये परत मागितले. परंतु, त्याने आज उद्या काम होईल, असे सांगून पैसे परत दिले नाही. त्यानंतर त्याने १२ लाख रुपयांचा धनादेश दिला. तो खात्यात पैसे नसल्याने परत आला. धर्मपाल याचा मोबाईलही लागत नसल्याने शेवटी फिर्यादी यांनी पोलिसांकडे धाव घेत फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक कांचन जाधव (PI Kanchan Jadhav) तपास करीत आहेत.