Shrimant Bhausaheb Rangari Ganpati | राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) जयंत पाटील यांनी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती चे दर्शन घेऊन केली आरती; पुनीतदादा बालन यांनी केला प्रदेशाध्यक्षांचा सन्मान (Videos)

Jayant Patil-Punit Balan

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Shrimant Bhausaheb Rangari Ganpati | राज्यभरात गणेशोत्सवाचा सोहळा पाहायला मिळत आहे. घरोघरी गणरायाचं आगमन झालंय, गणेशोत्सवासाठी देशभरातून आणि परदेशातून अनेक भाविक पुणे शहरांमध्ये येत असतात. ‘गणपती बाप्पा मोरया’, ‘मंगलमूर्ती मोरया’ गजरात, सनई व चौघड्यांची सुरावट, शंख नाद आणि ढोल ताशांचा जल्लोषपूर्ण निनाद आणि पारंपरिक रथ अशा उत्साही व मंगलमय वातावरणात हिंदुस्थानातील पहिल्या सार्वजनिक गणपतीचे, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे बाप्पा शनिवारी (दि ७) मोठ्या जल्लोषात हजारो भाविकांच्या उपस्थितीत ‘वरद विघ्नेश्वर वाड्यात’ विराजमान झाले. प्रसिद्ध गायक पद्मश्री कैलाश खेर यांच्या हस्ते मंत्रोच्चारात बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती. (Bhau Rangari Ganpati)

प्राणप्रतिष्ठेनंतर कैलाश खेर यांनी भाविकांनी केलेल्या मागणीला दाद देत काही गाणी सादर केली. भाविकांनी त्यास जोरदार प्रतिसाद दिला. ट्रस्टचे उत्सव प्रमुख व विश्वस्त पुनीतदादा बालन (Punit Balan) व जान्हवी धारीवाल – बालन (Janhavi Dhariwal Balan) या दांपत्याच्या हस्ते श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाची विधीवत पूजा व आरती झाली. त्यानंतर भवन परिसरात तृतीय पंथीयांचे पथक ‘शिखंडी’ तर्फे दहा मिनिटांचा जोरदार गजर करण्यात आला. यावेळी भवन परिसरातील वातावरण भक्तीमय झाल्याचे पाहायला मिळाले.

(दि.८) समीर पाठक (ग्लोबल चेसलिग) सीईओ महिंद्रा अँड महिंद्रा,अजयबुवा रामदासी, सुप्रसिद्ध हिन्दी अभिनेत्री इशा तलवार (मिर्झापूर फेम) यांच्या हस्ते सायंकाळी आरती करण्यात आली. श्रींचा अभिषेक झाल्यानंतर (दि.९) बाप्पाची सकाळची आरती नीरव सुरतवाला, दिलीप आडकर (गुड मॉर्निंग ग्रुप, डीजीपी) यांनी केली. दुपारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (Sharad Pawar NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी बाप्पाचे दर्शन घेऊन आरती केली. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त आणि उत्सव प्रमुख पुनीतदादा बालन यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.

रात्रीच्या बाप्पाच्या आरतीला डॉ. जालिंदर सुपेकर (विशेष पोलीस महानिरीक्षक, तुरुंग विभाग), संभाजी कदम (पोलीस उपायुक्त,झोन ३) आणि परिवार, स्वप्निल कुसळे.(ऑलिंपिक पदक विजेते) व सहभागी खेळाडू उपस्थित होते.