Pune Rural Police News | 3 गावठी पिस्टल, 9 गावठी सुतळी बॉम्बसह कुख्यात गुन्हेगार तात्या घोडके जेरबंद (Video)

Walchandnagar Police

स्थानबद्ध करण्याचा जिल्हाधिकार्‍यांनी दिला होता आदेश

पुणे : Pune Rural Police News | पुणे, नातेपुते (Natepute), सातारा (Satara), बारामती (Baramati), वालचंदनगर (Walchandnagar) परिसरात जबरी चोरी (Robbery), घरफोडी (House Burglary), खुनाचा प्रयत्न (Attempt To Murder), वाळू तस्करी (Sand Smuggling) अशा गुन्ह्यांमुळे दहशत माजविणार्‍या कुख्यात गुन्हेगाराला वालचंदनगर पोलिसांनी (Walchandnagar Police) जेरबंद केले आहे.

सुयश ऊर्फ तात्या घाडके Suyash Alias Tatya Ghodke (रा. कामगार वसाहत, वालचंदनगर) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. वालचंदनगर पोलिसांनी त्याला पकडताना त्यांच्याकडून ३ गावठी पिस्टल, १० जिवंत काडतुसे, ९ गावठी सुतळी बॉम्ब, पालघन, तलवारीचे पाते, रिकामे मॅगझीन असा शस्त्रसाठा जप्त केला आहे.

तात्या घोडके याच्यावर ९ गंभीर गुन्हे दाखल असून तो बारामती परिसरात दहशत माजवत असल्याने त्याच्याविरुद्ध तक्रार देण्यासाठी कोणी पुढे येत नव्हते. वालचंदनगर पोलीस ठाण्याचे तत्कालीन प्रभारी अधिकारी विक्रम साळुंखे यांनी त्याच्यावर MPDA अंतर्गत स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या मार्फत जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे (Suhas Diwase) यांच्याकडे सादर केला होता.

त्याला जिल्हाधिकारी दिवसे यांनी ३ सप्टेबर रोजी स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला होता. मात्र, तात्या घोडके हा फरार होता. पोलीस त्याचा शोध घेत असताना हवालदार शैलेश स्वामी, हवालदार गणेश काटकर यांना तात्या हा त्याच्या जुन्या घरात बाहेरुन कुलूप लावून आत लपून बसला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याच्या कामगार वसाहतीतील घराला चारही बाजूने घेरले. त्यानंतर मागील बाजूने घरात प्रवेश करुन त्याला जेरबंद केले. त्याच्या घरामध्ये मॅगझीन असलेले ३ गावठी पिस्टल, एक रिकामे मॅगझिन, १० जिवंत काडतुसे, ९ गावठी सुतळी बॉम्ब, १ पालघन, मुठ नसलेले तलवारीचे पाते, २ चाकून, २ कटर, १४ मोबाईल असा मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख (Pankaj Deshmukh IPS), अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार (Ganesh Biradar Addl SP), उपविभागीय अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड (Dr. Sudarshan Rathod), पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर (PI Avinash Shilimkar) यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे (API Rajkumar Dunge), हवालदार शैलेश स्वामी, हवालदार गणेश काटकर, हवालदार प्रमोद बनसोडे, पोलीस अंमलदार अभिजित कळसकर, अमोल चितकोटे, राम आढाव, निता किर्दक, प्रमोद टापसे, अमोल सोनवणे, महेश चोपणे यांनी केली आहे.