Ajit Pawar On Amit Shah Meeting | अमित शहांकडे केलेल्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवरून अजित पवारांचे स्पष्टीकरण; म्हणाले – “अमित शहा यांच्या बैठकीत…”

पुणे : Ajit Pawar On Amit Shah Meeting | उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर असताना बिहार पॅटर्न राबवून विधानसभेनंतर माझ्या नावाची मुख्यमंत्रीपदी घोषणा करा, अशी मागणी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. (Maharashtra Assembly Election 2024)
मात्र यामध्ये कसलेही तथ्य नसून मी मुख्यमंत्री पदाबाबत अमित शहांकडे चर्चा केली नसल्याचे स्पष्टीकरण अजित पवार यांनी पुणे येथील पत्रकार परिषदेत दिले आहे. तसेच महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांनी २५ जागांवर मैत्रीपूर्ण लढत व्हावी, अशी मागणी केल्याची चर्चाही त्यांनी फेटाळून लावली आहे.
अजित पवार म्हणाले , “मुख्यमंत्रिपदाबाबतच्या चर्चेमध्ये कसलंही तथ्य नाही. मी अमित शहा यांच्या बैठकीत त्यांच्याशी कापूस, सोयाबीन आणि कांदा उत्पादकांसह इतर प्रश्नांवर चर्चा केली. यापुढे कांद्याची निर्यात बंदी होऊ नये, तसंच आपण एफआरपीचे दर वाढवतो मात्र एमएसपीमध्ये वाढ झालेली नाही, ती वाढ करावी, अशा विविध मागण्यांबाबत मी त्यांच्याशी चर्चा केली,” असा दावा अजित पवार यांनी केला आहे.