Walchandnagar Pune Crime News | साईड देण्यासाठी हॉर्न वाजविल्याने तरुणाला बेदम मारहाण; एक महिन्यांपासून घेत आहे उपचार

पुणे : Walchandnagar Pune Crime News | वस्तीवर जाणारा रस्ता अरुंद असल्याने साईड देण्यासाठी हॉर्न वाजविल्याने कारमधील चौघांनी दुचाकीस्वाराला बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत जखमी झालेला तरुण गेल्या एक महिन्यांपासून उपचार घेत आहे. (Marhan News)
बापूराव निवृत्त मारकड (वय ४४, रा. चौगुलखडा, लासुर्णे, ता. इंदापूर) यांनी बारामती येथील पवार हॉस्पिटलमधील आय सी युमधून वालचंदनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी दीपक राजेंद्र वाघमोडे व त्याच्या तीन साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे मुलाच्या लग्न पत्रिका पाहुण्यांना वाटण्याकरीता मोटारसायकलवरुन १२ ऑगस्ट रोजी दुपारी दीड वाजता जात होते. (Walchandnagar Police Station)
त्यांच्या पुढे नंबर प्लेट नसलेली स्विफ्ट कार जात होती. रस्ता अरुंद असल्याने त्यांनी साईड साठी हॉर्न वाजविला. पण कारचालकाने साईट दिली नाही. काही अंतर गेल्यावर कार मधोमध थांबली. त्यातून त्यांच्या शेजारी राहणारा दीपक वाघमोडे व इतर तिघे जण उतरले. दीपक याने फिर्यादी यांना “तुला माज आला आहे का” असे म्हणून हातातील लोखंडी रॉडने वार केले. त्यांनी ते हुकवले. दुसरा वार त्यांच्या हातावर बसला. इतरांनी हातातील काठ्या व प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण केली. फिर्यादी खाली पडून त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा केल्याने वस्तीवरील काही जण पळत आले. तेव्हा दीपक म्हणाला, “माझ्या नादी लागला तर तुला जिवंत ठेवणार नाही,” असे म्हणून फिर्यादीच्या मोटारसायकलची मोडतोड करुन ते पळून गेले. लोकांनी त्यांना वालचंदनगर पोलीस ठाण्यात नेले. पोलिसांनी यादी दिल्यानंतर त्यांना लासुर्णे दवाखान्यात उपचारासाठी नेले. तेथून पुढे निमगाव केतकी येथील सरकारी दवाखान्यात काही उपचार घेतला. त्यानंतर पुढे इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात काही उपचार घेतले.
दरम्यान, त्यांच्या पत्नीने सांगितले की, दुपारी काही जण येऊन त्यांच्या पाणी साठवण्याची प्लास्टिकची टाकी तसेच घरासमोरील उभा ट्रॅक्टर याची तोडफोड करु नुकसान केल्याचे सांगितले. त्यानंतर फिर्यादी यांना बारामती येथील डॉ. माने यांच्या अॅक्सिडेट हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यांची मनस्थिती ठिक नसल्याने त्यांनी कोठे तक्रार केली नाही. २४ ऑगस्ट रोजी त्यांना हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आले. त्यानंतर मारहाणीचा त्रास वाढल्याने जेजुरी येथील डॉ. सिंह यांच्याकडे उपचार सुरु केले. त्यानंतर २९ ऑगस्ट रोजी पुण्यातील भारती हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथे उपचार सुरु असताना तो खर्च परवडत नसल्याने ५ सप्टेबरपासून ते बारामती येथील डॉ. पवार हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. जवळपास महिन्याभरानंतर वालचंदनगर पोलिसांनी दखल घेऊन रविवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे.