Pune Crime Court News | अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या जेष्ठाला 20 वर्षे सक्तमजुरी

Crime Court News | Additional District and Sessions Court rejects anticipatory bail application of Shiva Tiwari, accused in land grabbing case based on fake documents

पुणे : Pune Crime Court News | शाळकरी मुलीवर अत्याचार करणाऱ्या ७० वर्षांच्या सेवानिवृत्त सरकारी कर्मचाऱ्याला विशेष न्यायाधीश के.पी. क्षीरसागर (Judge KP Kshirsagar) यांनी २० वर्षे सक्तमजुरी, तसेच दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. अशोक गुंजाबाबी डोंगोरे Ashok Gunjababi Dongore (वय-७०, रा. धानोरी) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात (Vishrantwadi Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला होता.

३१ ऑक्टोबर २०१९ रोजी सात वर्षांची मुलगी आजोबांसह बागेत खेळायला गेली होती. आरोपी तिथे पाळीव श्वानाला घेऊन आला होता. त्याने पीडित मुलीला एका नियोजित गृहप्रकल्पाच्या ठिकाणी नेले. तेथे तिच्यावर त्याने अत्याचार केले.

त्यानंतर घाबरलेल्या मुलीने आईला या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले. या खटल्यात विशेष सरकारी वकील नितीन कोंघे यांनी बाजू मांडली. सरकार पक्षाकडून दहा साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली.

या खटल्यात मुलगी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष महत्त्वाची ठरली. आरोपीला दूरदृश्य प्रणालीद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले. तेव्हा ‘हेच ते डॉगीवाले अंकल’ म्हणून तिने ओळखले. आरोपीने अत्याचार केल्याची साक्ष तिने न्यायालयासमोर नोंदविली.

आरोपीने घृणास्पद कृत्य केले. त्याच्या कृत्यामुळे सात वर्षांच्या पीडित मुलीला शारीरिक आणि मानसिक धक्का बसला. आरोपी ज्येष्ठ नागरिक असला, तरी त्याला कोणतीही दयामाया न दाखविता कठोर शिक्षा देण्यात यावी’, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील कोंघे यांनी केला. न्यायालयाने सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीला शिक्षा सुनावली

भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम ३९६ अन्वये मुलीला नुकसान भरपाई देण्याची सूचना पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाला न्यायालयाने केली.