Chhagan Bhujbal On Vidhan Sabha Election | ‘ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता’, छगन भुजबळांचे वक्तव्य; म्हणाले,…

chhagan-bhujbal image

नाशिक : Chhagan Bhujbal On Vidhan Sabha Election | राज्यात विधानसभा निवडणूकांसाठी बहुतांश पक्षांकडून हळूहळू उमेदवारांची घोषणा होण्यास सुरुवात झाली आहे. राजकीय वर्तुळात विधानसभेचे वारे वाहत असून सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. मात्र विधानसभा निवडणूक नेमकी कधी पार पडणार याबाबत चर्चा सुरु असतानाच मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेला घेऊन महत्वाचे विधान केले आहे.

ऑक्टोबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याचे सूतोवाच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. नाशिकच्या येवला दौऱ्यावर आले असता ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

ते म्हणाले, महायुती सरकार (Mahayuti Govt) विधानसभेच्या अधिवेशनात मराठा समाजाला (Marath Samaj) १० टक्के आरक्षण मंजूर केले आहे. त्याचा लाभ मराठा बांधवांना होतोय. अजित पवार (Ajit Pawar)आमचे कॅप्टन आहेत. त्यांनी शस्त्र खाली ठेवणे योग्य होणार नाही. ते बारामतीतूनच लढतील आणि मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वासही भुजबळ यांनी व्यक्त करीत अजित पवार बारामतीतून निवडणूक न लढण्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. (Maratha Reservation Andolan)