Bhekrai Nagar Pune Crime News | पतीच्या त्रासाने विवाहितेने गळफास घेऊन केली आत्महत्या ! अनैतिक संबंधाबाबत विचारणा केल्याने देत होता त्रास, भेकराईनगरमधील घटना

पुणे : Bhekrai Nagar Pune Crime News | लग्न झाले असतानाही बाहेर स्त्रीशी संबंध ठेवल्यावरुन विचारणा केल्याने सातत्याने होणार्या शारीरीक व मानसिक त्रासाला कंटाळून विवाहितेने गळफास (Hanging Case) घेऊन आत्महत्या केली. (Suicide Case)
तेजश्री आकाश उदमले (वय २२, रा. शिक्षक कॉलनी, भेकराईनगर, फुरसुंगी) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी देऊबाई पांडुरंग नेटके (वय ६५, रा. कोरगाव, ता. कर्जत, जि. अहमदनगर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आकाश अशोक उदमले (वय २५, रा. शिक्षक कॉलनी, भेकराईनगर, फुरसुंगी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची नात तेजश्री व आकाश यांचा मार्च २०१९ मध्ये विवाह झाला होता. विवाहानंतरही आकाश हा परस्त्रीबरोबर अनैतिक संबंध ठेवून होता. ती बाब त्याने लपवून ठेवली होती. ती समजल्यावर तेजश्री हिने त्याबाबत विचारणा केली. तेव्हापासून तो तिला सतत मारहाण, शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी देत होता. घर खर्चासठी पैसे मागितल्यावर पैसे न देता तिला तु वांझोटी आहेस, तुला मुल होणार नाही, असे टोमणे मारुन तिचा शारीरीक व मानसिक छळ करत होता. या त्रासाला कंटाळून तेजश्री हिने ७ सप्टेबर रोजी राहत्या घरी फॅनला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलीस उपनिरीक्षक पवार तपास करीत आहेत.