Pune Crime News | 63 वर्षाच्या वकिलाला पत्नी, भाऊ आणि भावजयीने केली बेदम मारहाण; काय घडले नेमके वाचा सविस्तर

Wife Beat Husband (1)

पुणे : Pune Crime News | पत्नीच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही तर काय होते, याचा प्रत्यय एका ६३ वर्षाच्या वकिलाला चांगलाच आला. या वकिलाला त्याची पत्नी, भाऊ व भावजय यांनी काठीने मारहाण करुन जखमी केले. (Junnar Crime)

याप्रकरणी ६३ वर्षाच्या वकिलाने जुन्नर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी त्यांची पत्नी, भाऊ व भावजयीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना जुन्नर तालुक्यातील बेलसर येथे मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे वकिली व्यवसाय करतात. मंगळवारी सकाळी ते खिचडी खात असताना त्यांना त्यांच्या पक्षकाराचा फोन आला. ते फोनवर बोलत असताना त्यांच्या पत्नीने कोणाचा फोन आला, अशी विचारणा केली. त्यावर त्यांनी काहीच उत्तर न दिल्याने पत्नीने त्यांच्या हातातून फोन हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावर फिर्यादी तिला म्हणाले की, तु माझा फोन कशासाठी घेते, माझे पक्षकाराशी बोलणे चालू आहे. त्यामुळे पत्नी व फिर्यादी यांच्यात बाचाबाची चालू झाली. त्यावेळी त्यांचा भाऊ व भावजयी आले. भावाने तुमचा वाद का चालू आहे, असे म्हणून हातातील वेळूची काठीने फिर्यादीच्या मानेवर मारहाण केली. फिर्यादी यांनी ती काठी पकडली. तेव्हा भाऊ व भावजयीने काठी जोरात ढकलली. ती काठी त्यांच्या पत्नीला लागली. त्यानंतर त्यांनी शिवीगाळ करीत मारहाण केली. त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. फिर्यादी यांनी जखमेवर उपचार घेतल्यानंतर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला असून जुन्नर पोलीस (Junnar Police Station) तपास करीत आहेत.