Pune Metro News | पुणे : बुधवार पेठ, मंगळवार पेठ आणि नाशिक फाटा या तीन मेट्रो स्थानकांची नावे बदलण्यात येणार

Pune-Metro

पुणे : Pune Metro News | शहरातील अनेक मेट्रो स्थानकांच्या नावाला आक्षेप घेण्यात आला आहे. शहरातील काही मेट्रो स्थानकांची नवे बदलण्याची मागणी मागील काही दिवसांपासून केली जात आहे. त्याबाबत आता महत्वाची अपडेट समोर आली आहे. पुणे शहरातील तीन स्थानकांची नावे बदलण्यात येणार आहेत. पुण्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

ही नामांतराची प्रक्रिया पूर्ण झाली असून याबाबतचे गॅझेटही लवकरच प्रसिद्ध होणार आहे. शहरातील बुधवार पेठ (Budhwar Peth) , मंगळवार पेठ (Mangalwar Peth) आणि नाशिक फाटा (Nashik Phata) या तीन स्थानकांची नावे बदलण्यात येणार आहेत. या नामांतरानंतर बुधवार पेठ स्थानकाचे नाव कसबा पेठ स्थानक (Kasba Peth Metro Station), मंगळवार पेठ स्थानकाचे नाव आरटीओ स्थानक (RTO Metro Station Pune) आणि नाशिक फाटा स्थानकाचे नाव कासारवाडी (Kasarwadi Metro Station) असे करण्यात येणार आहे.

तसा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे. तसेच सिव्हिल कोर्ट स्थानकाचे नाव शिवाजीनगर जिल्हा न्यायालय करण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. पुण्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज स्वारगेट मेट्रो स्टेशनची पाहणी केली. स्वारगेट मेट्रो स्टेशन (Swargate Metro Station) हे भूमिगत असून मल्टी मॉडेल हब (Multi Model Hub) म्हणून ओळखले गेले आहे.

अत्यंत अत्याधुनिक आणि अद्यावत पध्दतीने हे मेट्रो स्टेशन लवकरच प्रवाशांसाठी खुले करण्यात येईल तसेच स्वारगेट ते कात्रज या मार्गाचे देखील भूमिपूजन सोहळा पार पडेल, असा विश्वास केंद्रीय मंत्री मोहोळ यांनी वर्तवला. तसेच पुणे मेट्रोसाठी दोन मार्ग आहेत. एक मार्ग पूर्ण झाला आहे, वनाज ते रामवाडी १५ किमी अंतर पूर्ण झाले आहे.

पीसीएमसी ते स्वारगेट याचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. शिवाजीनगर, सिव्हील कोर्ट, स्वारगेट, यांच्या तांत्रिक परवानगी झाल्यावर काहीच दिवसात हे स्टेशन सुरू होईल. कसबा पेठ, मंडई या स्टेशन ची कामे पूर्ण झाली आहेत, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.