Hadapsar Pune Crime News | पुण्यातील फायनान्स मॅनेजरच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; 3 अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Murder In Hadapsar Pune

पुणे : Hadapsar Pune Crime News | एका फायनान्स कंपनीत मॅनेजर असलेल्या वासुदेव रामचंद्र कुलकर्णी (वय ४७, रा. उत्कर्षनगर, हडपसर) यांची अज्ञात व्यक्तीनी हत्या केल्याची घटना घडली होती (Murder In Hadapsar Pune). या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. क्षुल्लक कारणासाठी वासुदेव यांची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. धक्कादायक म्हणजे, तीन आरोपी असून ते अल्पवयीन आहेत. वासुदेव कुलकर्णी हे पुण्यात फायनान्स कंपनीत मॅनेजर म्हणून काम करत होते. (Hadapsar Police Station)

रविवारी रात्री (दि.१) वासुदेव कुलकर्णी हे शतपावली करत असताना त्यांच्या मोबाईलचे हॉटस्पॉट या अल्पवयीन मुलांनी मागितले. मात्र, वासुदेव यांनी हॉयस्पॉट न दिल्याने त्यांनी रागात त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. यातच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे तर एकाला अटक ही केली आहे.