Swargate Pune Crime News | गाडीचे सीट फाडल्याने भटक्या कुत्र्यांना मारहाण, प्राणी प्रेमीच्या तक्रारीवरुन पिता-पुत्रांवर गुन्हा दाखल

dog-bite-1

पुणे : Swargate Pune Crime News | सोसायटीमध्ये पार्क केलेल्या गाडीचे सीटकव्हर फाडल्याने चिडलेल्या पितापुत्राने कुत्री व तिच्या पिल्लांना काठीने मारहाण केली. हा प्रकार एका प्राणीप्रेमीला कळाल्यावर त्याने पोलिसांकडे तक्रार केली असून पोलिसांनी पितापुत्रांवर गुन्हा दाखल केला आहे. भरतकुमार धनराज गांधी (Bharatkumar Dhanraj Gandhi) आणि हर्षद भरतकुमार गांधी Harshad Bharatkumar Gandhi (रा. आदिनाथ सोसायटी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत अ‍ॅड.

अमित शहा यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात (Swargate Police Station) फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शहा यांना एकाचा फोन आला. भरतकुमार गांधी हे भटक्या कुत्र्यांना मारत आहेत. शहा यांनी भरतकुमार यांना फोन करुन विचारणा केली. तेव्हा त्यांनी या कुत्र्यांनी सर्व गाड्यांची सीट फाडली. इथं लोकांचे नुकसान होते आहे, असे ते म्हणाले, त्यावर फिर्यादी यांनी मी नुकसान भरुन देतो, असे सांगून ते खाली आली. तेव्हा भरतकुमार गांधी यांच्या हातात काठी होती. ते व त्यांचे मुलगा काठीने कुत्र्यांना मारत होते. शहा यांनी तक्रार दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.