Pune Pimpri Chinchwad Crime News | 12 वर्षाच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार करणारा नराधम जेरबंद

पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | गोड बोलून रिकाम्या खोलीत नेऊन १२ वर्षाच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार (Unnatural Torture) करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वाकड पोलिसांनी (Wakad Police) एकाला अटक केली आहे.
उदय मारुती लोखंडे Uday Maruti Lokhande (वय १८, रा. वैदवाडी वस्ती, पिंपळे गुरव, सांगवी) असे अटक केलेल्या नराधमाचे नाव आहे. याबाबत मुलाच्या वडिलांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार रहाटणी बसस्टॉपपासून गोंडांबे चौकाकडे जाणार्या रोडवर शनिवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा १२ वर्षाचा मुलगा रहाटणी बसस्टॉपपासून गोंडांबे चौकाकडे पायी जात होता. त्यावेळी मोटारसायकलवरुन एक जण त्याच्या जवळ आला. चल घरी सोडतो, असे सांगून त्याला मोटारसायकलवर बसवून सांगवी परिसरातील मैदानाजवळील रिकाम्या खोलीमध्ये घेऊन गेला. तेथे त्याने या मुलावर अनैसर्गिक संभोग केला. तसेच झालेल्या प्रकाराबाबत कोणाला सांगितले तर मारुन टाकण्याची धमकी दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांना या नराधमाचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक घोरपडे तपास करीत आहेत.