Pune Pimpri Chinchwad Crime News | पिस्टल व जिवंत काडतुसे बाळगणार्या तडीपार गुंडासह दोघांना अटक; 3 पिस्टल, 4 जिवंत काडतुसे जप्त

पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | शहरातून तडीपार केले असतानाही पिस्टलसह वावरणारा गुंड तसेच विक्री करण्यासाठी आलेल्या सराईताकडून पोलिसांनी 3 पिस्टल व 4 जिवंत काडतुसे असा 1 लाख 52 हजार रुपयांचा माल हस्तगत केला आहे. (Tadipar Criminal Arrested)
जुनेद जमील शेख (वय 18, रा. मिलिंदनगर, पिंपरी) असे या गुंडाचे नाव आहे. पिंपरी तपास पथकाचे पोलीस अंमलदार रोहित वाघमारे, गणेश काकड यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की, एक रेकॉर्डवरील गुन्हेगार अॅटो क्लस्टकडे जाणार्या ब्रीजचे सर्व्हिस रोडवर सायंकाळी कोणातरी भेटायला येणार आहे. त्याच्याकडे पिस्टल आहे. या बातमीची खात्री करण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला. सर्व्हिस रोडवर कोणाची तरी वाट पहात असलेल्या जुनेद शेख याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे दोन देशी बनावटीचे पिस्टल व दोन काडतुसे असा माल मिळून आला.
पिंपरी तपास पथकाचे पोलीस अंमलदार विकास रेड्डी यांना बातमीदारांकडून माहिती मिळाली की, तडीपार गुंड गणेश ऊर्फ मॅड भुंगा कांबळे(रा. निराधार नगर) व रेकॉर्डवरील गुन्हेगार तौफिक ऊर्फ तौफ्या चांद शेख हे निराधारनगर वस्तीमध्ये हातात पिस्टल घेऊन हवेत फिरवून दहशत निर्माण करत आहेत. ही माहिती मिळताच पोलीस तातडीने तेथे गेले. त्यांनी गणेश कांबळे याला पिस्टल व दोन जिवंत काडतुसासह पकडले.
ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहा पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, सहायक पोलीस आयुक्त सचिन हिरे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलग, पोलीस निरीक्षक धनंजय कापरे, सुहास आव्हाड, सहायक पोलीस निरीक्षक दिगंबर अतिग्रे, पोलीस उपनिरीक्षक शाकीर जिनेडी, हवालदार बारशिंगे, हांडे,बेंदरकर, वारडे, शिंदे, झांबरे, अभंगराव, पोलीस नाईक बंड, मुजावर, रेड्डी, जानराव, वाघमारे, काकड, आचार्य, बजबळकर, ढवळे, पुंडे, कवठेकर, महिला पोलीस हवालदार कोंडे, कोल्हे, चव्हाण यांनी केली आहे.