Amol Balwadkar | भारतीय जनता पक्षाच्या सदस्यता मोहिमेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे; अमोल बालवडकर यांचे नम्र आवाहन

पुणे : भारतीय जनता पक्षाने (Bharatiya Janata Party-BJP) 2 सप्टेंबरपासून देशभरात नवीन सदस्यत्व मोहिम सुरु केली आहे. 10 लाखांहून अधिक सदस्य या मोहिमेत सक्रियपणे सहभागी होत आहेत. त्यातून 20 कोटी सदस्यांची नोंदणी करण्याची मोहिम सुरु करण्यात आली आहे. या मोहिमेत पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता म्हणून मी सहभागी होत असून आपणही भारतीय जनता पक्षाच्या सदस्यता मोहिमेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन अमोल बालवडकर यांनी केले आहे. (Membership Drive Of BJP)
याबाबत अमोल बालवडकर यांनी सांगितले की, भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून मी हे आवाहन सर्वांना करत आहे. लोकशाहीतला सर्वात मोठा उत्सव म्हणजे निवडणुक़ महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक लवकरच जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने सदस्यता मोहिम हाती घेतली आहे.
भाजप हा निव्वळ राजकीय पक्ष नाही. भाजप म्हणजे राष्ट्रीय विचारधारा आहे. भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. भाजप हा सर्वांना सामावून घेणारा परिवार आहे. म्हणूनच भाजपचा कार्यकर्ता होण्यात आनंद आहे, अभिमान आहे. भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांनी १९९६ मधील भाषण मला आठवते. भोपाळ येथील भाजप प्रांत अधिवेशात अटलजी म्हणाले ‘‘आज जे आमदार आहेत, ते उद्या कदाचित आमदार नसतील. कोणी आज खासदार असतील, उद्या नसतील. काही जणांना पक्ष बदलतो. काही जणांना लोक बदलतात. मात्र कार्यकर्ता हे असं पद आहे जे कधीच, कोणी बदलू शकत नाही. कार्यकर्ता होण्याचा आपला अधिकार कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. कारण पक्षनिष्ठा आणि कष्टाच्या बळावर आपण ते मिळवलेलं असतं.’’
मला आदरस्थानी असणारे पुण्याचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय गिरीशभाऊ बापट यांचे अखेरचं संबोधन मला अजूनही आठवतं. बापटसाहेब मृत्युशय्येवर असताना कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारात उतरण्यासाठी त्यांच्यातला कार्यकर्ता धडपडत होता. देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते, डॉक्टर बापट साहेबांना आपण आराम करा, निवडणुकीचा विचार करु नका असे सांगत होते. पण जातीवंत कार्यकर्ता असलेले बापट साहेब व्हिलचेअरवरुन कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आले. नाकातोंडात ऑक्सिजनच्या नळ्या होत्या. त्यांना बोलताना त्रास होत होता. तरीही त्यांच्यातील कार्यकर्ता स्वस्थ बसला नाही. त्यात परिस्थितीत त्यांनी कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला. बापट साहेब त्यांच्या आयुष्यातल्या अखेरच्या जाहीर भाषणात म्हणाले,‘‘कार्यकर्ता हा पक्षाचा आत्मा आहे. मी अनेक वर्षे या आत्म्याची सेवा करण्यासाठी दिली आहेत. कार्यकर्ते जपा. संघटन वाढवा. पक्ष वाढवा.’’
भारतावर प्रेम करणार्या प्रत्येकानं भाजपाचं सदस्य व्हावं. कार्यकर्त्यांला प्रतिष्ठा देणार्या भाजपचं सदस्यत्व आपण स्वीकारावं. जात, धर्म, भाषा, प्रांत, गरीब-श्रीमंत असा कोणताही भेद जिथं नाही, अशा राष्ट्रीय विचारांच्या भाजपचे सदस्यत्व घ्यावे, असे माझे सर्वांना आवाहन आहे, असे अमोल बालवडकर यांनी सांगितले.