Pune Police News | दोन वर्षाची हरविलेली मुलगी एका तासात आईच्या कुशीत

पुणे : Pune Police News | दोन वर्षाच्या हरविलेल्या मुलीला एका नागरिकांनी पोलिसांकडे आणून दिले. त्यानंतर पोलिसांनी तिच्या आई वडिलांचा शोध घेतला. एका तासाच्या आत ही मुलगी आईच्या कुशीत विसावली. ते पाहून पोलिसांच्या जीव भांड्यात पडला.
बालेवाडी हायस्ट्रिट (balewadi High Street) परिसरात शुक्रवारी रात्री आठ वाजता हा ड्रामा घडला होता. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालेवाडी हाय स्ट्रिट रस्त्यावर एका २ वर्षांची मुलगी रडत असल्याचे सिमेन्स कंपनीचे गार्ड निकम यांनी पाहिले. त्या मुलीला त्यांनी बालेवाडी पोलीस चौकीत आणून दिले. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक बाळासाहेब झरेकर (API Balasaheb Zarekar) , पोलीस अंमलदार साबळे व घाटोळे यांनी या मुलीच्या आई वडिलांचा बालेवाडी परिसरात शोध घेण्यास सुरुवात केली. तिचे आई वडिलही मुलीचा शोध घेत होते. खेळत असताना रस्त्याने ती निघून चुकली होती. काही वेळात तिचे आई वडिलांचा शोध लागला. रडून रडून थकलेल्या या मुलीची आईला पाहताच कळी खुलली आणि ती आईकडे झेपावली. पोलिसांनी या मुलीला तिच्या आई वडिलांकडे सुपूर्त केले. (Balewadi Police Chowki)