Kondhwa Pune Crime News | हॉटेलमध्ये बेकायदेशीर हुक्का पार्लर ! रमेश बागवे यांच्या मुलासह 5 जणांवर गुन्हा दाखल

पुणे : Kondhwa Pune Crime News | हॉटेलमध्ये बेकायदेशीरपणे हुक्का पार्लर चालविणा र्या द व्हिलेज हॉटेलचे मालक बाकीर रमेश बागवे यांच्यासह पाच जणावर कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police) गुन्हा दाखल केला आहे. (Pune Police Raid On Hookah Parlour)
बाकीर रमेश बागवे Bakir Ramesh Bagwe (वय ३६, रा. भवानी पेठ, लोहियानगर), हरुन नबी शेख (वय २०, रा. पश्चिम बंगाल), बिक्रम साधन शेख (वय २०), अमानत अन्वर मंडळ (वय २२), अमानत अन्वर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर (PI Vinay Patankar) यांच्या आदेशानुसार सहायक पोलीस निरीक्षक अमित शेटे (Amit Shete) व पोलीस अंमलदार पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी एन आय बी एम रोडवरील (NIBM Road Kondhwa) द व्हिलेज हॉटेलमध्ये (The Village Hotel NIMB Road) चोरुन ग्राहकांना बेकायदेशीरपणे हुक्का पिण्यासाठी उपलब्ध करुन दिला जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी गुरुवारी रात्री छापा घातला. त्यावेळी पाच जण ग्राहकांना हुक्का पिण्यासाठी देत असल्याचे आढळून आले. तेथून हुक्काचे फ्लेवर व ९ हुक्का पॉट व इतर साहित्य असा २३ हजार ५०० रुपयांचा माल जप्त केला आहे.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त आर राजा (DCP R Raja), सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख (ACP Ashwini Rakh), वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अमित शेटे, पोलीस अंमलदार अक्षय शेंडगे, राहुल थोरात, सुहास मोरे, प्रदिप बेडिस्कर यांनी केली आहे.