Ganesh Biradar | बारामती अपर पोलीस अधीक्षकपदी गणेश बिरादार

पुणे : Ganesh Biradar | दौंड येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ५ चे समादेशक गणेश बिरादार यांची बारामती येथील अपर पोलीस अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. (Pune Rural Police)

गणेश बिरादार हे इंचलकरजीचे पोलीस उपअधीक्षक असताना २०२० मध्ये त्यांना पोलीस महासंचालकांचे विशेष सेवा पदक देण्यात आले होते. गडचिरोली येथे नक्षलग्रस्त भागात नक्षलग्रस्त लोकांचे प्रबोधन करुन परिवर्तन करण्यात यशस्वी ठरले. त्यासह या भागात सलग दोन वर्षे चांगली सेवा देऊन एकही पोलीस शहीद झाला नाही. इचलकरंजीत असताना बंधूंवर केलेली मोक्का अंतर्गत कारवाई राज्यभर गाजली होती.