Sahakar Nagar Pune Crime News | कमांड हॉस्पिटलमध्ये नोकरीच्या आमिषाने 70 जणांची 49 लाखांची फसवणूक ! व्हिआरएस घेतलेल्या कर्मचार्‍याला अटक, मित्रानेच केली फसवणूक

Cheating Fraud Case

पुणे : Sahakar Nagar Pune Crime News | वानवडीतील कमांड हॉस्पिटलमध्ये (Command Hospital Pune) क्लर्क, कॉम्प्युटर ऑपरेटर, माळी, स्वीपर, प्युन पदासाठी जागा भरावयाच्या असल्याचे सांगून नोकरीच्या आमिषाने ७० हून अधिक जणांची फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे (Lure Of Job). सहकारनगर पोलिसांनी (Sahakar Nagar Police Station) कमांड हॉस्पिटलमधून व्हिआरएस घेतलेल्या कर्मचार्‍याला अटक केली आहे. विशेष म्हणजे मित्र म्हणविणार्‍यानेच फसविले आहे.

विनायक तुकाराम कडाळे Vinayak Tukaram Kadale (वय ५३, रा. उत्तमनगर, एन डी ए खडकवासला, सध्या गंगाधाम, मार्केटयार्ड) असे अटक केलेल्या कर्मचार्‍याचे नाव आहे. याबाबत राजेंद्र काशिनाय हगवणे (वय ५३, रा. धनकवडी) यांनी सहकारनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विनायक कडाळे हा फिर्यादी यांचा जुना मित्र असून त्यांची १९८६ पासून ओळख आहे. कडाळे हा कमांड हॉस्पिटलमध्ये नोकरी असल्याचे माहिती होते. त्यांच्या घरीही येणे जाणे होते. नोव्हेबर २०२१ मध्ये विनायक कडाळे याने फिर्यादींना फोन करुन कमांड हॉस्पिटल, वानवडीमध्ये एम टी एस (मल्टी टास्क सर्व्हिस) क्लर्क, कॉम्प्युटर ऑपरेटर, माळी, स्वीपर, प्युन या पदाच्या जागा भरावयाच्या आहेत. कोणी इच्छुक उमेदवार असतील तर सांगा, तसेच या नोकरीसाठी प्रत्येकी ७० हजार रुपये भरावे लागतील, असे कळविले. फिर्यादी यांनी आपल्या मुलीसाठी प्रयत्न करावयाचे ठरविले.

विनायक कडाळे याने विविध पदांच्या अनेक जागा भरावयाच्या असल्याने इतर नातेवाईक, मित्रांपैकी कोणाची मुले असतील तर कळवा, असे सांगितले. त्याप्रमाणे फिर्यादी यांनी नातेवाईकांना, मित्र परिवारातील अनेक मुले नोकरीसाठी इच्छुक होते़. विनायक कडाळे याने त्यांची मिटिंग फिर्यादी यांच्याच घरी घेतली. त्याने प्रत्येकाने वेगवेगळे पैसे न पाठविता एकाकडे जमा करुन त्याने आपल्याला पैसे पाठवावेत, असे सांगितले. स्वत:ची ओळख केवळ फिर्यादी यांच्या पुरतीच मर्यादित ठेवली. त्या प्रमाणे फिर्यादी यांच्या पत्नीच्या बँक खात्यातून ३० लाख ६० हजार रुपये कडाळे याच्या खात्यात जमा करण्यात आले. अन्य काही मुलांनी १८ लाख ७५ हजार रुपये कडाळे याच्या खात्यात जमा केले. त्यानंतर फिर्यादी हे कडाळे याला फोन करुन पदभरतीच्या प्रगतीबाबत सतत आढावा घेत होते. प्रत्येक वेळी तो काहीतरी अडचण असल्याचे सांगून काही दिवस वाट पाहण्यास सांगत असे. डिसेंबर २०२२ मध्ये त्याने व्हॉटसअपवर फिर्यादीची मुलगी व इतर काही जणांच्या नावे लेखी परिक्षेकरीता अ‍ॅडमिट कार्ड बनवून पाठविले. त्यावर १२ फेब्रुवारी २०२३ अशी लेखी परिक्षेची तारीख नमूद केली होती. त्यावर कमांड हॉस्पिटलचा गोल शिक्का होता. अशा स्वरुपाचे लेटर सर्व उमेदवारांना पाठविण्यात येणार असल्याचे कडाळे याने कळविले. कमांड हॉस्पिटलमध्ये १२ फेब्रुवारी २०२३ ला अशी कोणतीही परिक्षा नसल्याचे फिर्यादी यांना समजले. त्यानंतर बरेच दिवस कडाळे याच्याकडे पाठपुरावा करीत होते. त्यानंतर कडाळे याने फोन बंद केला. त्यांनी कमांड हॉस्पिटलमध्ये चौकशी केली तेव्हा, विनायक कडाळे याने २०१९ मध्येच कमांड हॉस्पिटलमधून व्हीआरएस घेतल्याचे समजले. अशी काही नोकर भरती चालू नसल्याचे कमांड हॉस्पिटलकडून समजले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी आता फिर्याद दिली असून सहकारनगर पोलिसांनी विनायक कडाळे याला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक विशाल पवार तपास करत आहेत.