Maharashtra Election BJP Strategy | विधानसभेसाठी संघाची भाजपला होणार मदत; केंद्रातील मवाळ चेहरा महाराष्ट्रात आणण्याच्या सूचना

Mohan Bhagwat-Narendra Modi

मुंबई : Maharashtra Election BJP Strategy | लोकसभा निवडणुकीत भाजपला राज्यात फटका बसल्यानंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election 2024) भाजपाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघही मदत करणार आहे. तसेच पक्षाला काही सूचनाही करण्यात आल्या आहेत. केंद्रीय पातळीवर आश्वासक असलेल्या एका मराठमोळ्या चेहऱ्याचा विधानसभेसाठी वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. महाराष्ट्र भाजपने अद्याप यावर कोणताही अंतिम निर्णय घेतला नसल्याची माहिती आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत नितीन गडकरी यांनी अधिक भूमिका बजावावी, असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील काही नेत्यांनी व्यक्त केले आहे. विधानसभेच्या फक्त प्रचारासाठीच नव्हे, तर नियोजनातही लक्ष घालण्याचे सुचवण्यात आले आहे. नितीन गडकरींचा (Nitin Gadkari) चेहरा राजकारणात अधिक सक्रिय करण्याबाबत विचारविनिमय सुरु आहे.

नितीन गडकरी यांचा विकासात्मक आणि मवाळ चेहरा भाजपला उपयुक्त ठरण्याचा अंदाज आहे. गेली काही वर्ष केंद्रीय मंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामांमुळे जनतेच्या मनात विश्वास निर्माण झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्र भाजपसाठी आगामी निवडणुकांत ते उपयुक्त ठरतील, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मत आहे.