Eknath Shinde On Maharashtra Assembly Election 2024 | ‘विधानसभेची हंडी महायुतीच फोडणार’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला, म्हणाले – “कितीही रडगाणं गायलं तरी…”

eknath-shinde

मुंबई : Eknath Shinde On Maharashtra Assembly Election 2024 | आगामी विधानसभा निवडणूक पुढील दोन ते तीन महिन्यात पार पडेल अशी चर्चा आहे. दरम्यान महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. लोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसला मात्र आगामी विधानसभेची हंडी महायुतीचे फोडणार असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. टेंभी नाका मित्रमंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दिघे साहेबांची दहीहंडी मानाची हंडी या ठिकाणी शिंदे उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी हा दावा केला.

एकनाथ शिंदे म्हणाले, आम्ही लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका शेतकरी आणि आता लाडका गोविंदा आदी सह इतर योजना आणल्या आहेत. मात्र यामुळेच विरोधकांच्या पोटात दुखू लागले आहे. त्यामुळे ते सारखे आरोप करत आहेत, त्यांच्या पाया खालची वाळू घसरली आहे. मात्र त्यांनी कितीही रडगाणं गायलं, कितीही आरोप केले तरी सुद्धा विधानसभेची हंडी महायुतीच फोडणार, असा दावा त्यांनी केला.

आमचे सरकार आल्यानंतर सर्व सण, उत्सव हे निर्बंध मुक्त केले. गोविंदा आता प्रो गोविंदा केला, त्यांचा विमा काढला. मात्र प्रत्येक गोविंदाने हा खेळ खेळताना काळजी घ्यावी असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले. आनंद दिघे यांनी सुरू केलेला हा सण आता महाराष्ट्र मध्ये देखील मोठ्या उत्साहात साजरा केला जात असल्याचेही ते म्हणाले.