Harshvardhan Patil Meet Sharad Pawar | भाजप नेते हर्षवर्धन पाटलांनी घेतली शरद पवारांची भेट; बैठकीत चर्चा सुरु; राजकीय हालचालींना वेग

Harshvardhan Patil - Sharad Pawar

पुणे : Harshvardhan Patil Meet Sharad Pawar | राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरु असतानाच आता शरद पवार आणि हर्षवर्धन पाटील यांची बैठक सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.

या भेटीवेळी राजकीय चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मागील काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटील भाजप (BJP) सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत सामील होण्याची शक्यता असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या.

त्यानंतर आज दोघे चर्चा करत आहेत त्यामुळे राजकीय वर्तुळाचं लक्ष याकडे लागलं आहे. या चर्चेनंतर हर्षवर्धन पाटील आणि शरद पवार यांच्यात नेमकं काय बोलणं झालं हे स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

इंदापूरमधून (Indapur Assembly) अजित पवारांच्या पक्षाचे (Ajit Pawar NCP) विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) यांची उमेदवारी नक्की मानली जात असल्याने गेली काही वर्ष भाजपसोबत घरोबा असलेले हर्षवर्धन पाटील वेगळी वाट धरण्याच्या तयारीत आहेत. हातात तुतारी घेणं किंवा अपक्ष निवडणूक लढवणं असे दोन पर्याय त्यांच्यासाठी खुले आहेत.