Chief Engineer Rajendra Pawar | मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांना उत्कृष्ट ग्राहक सेवा पुरस्कार प्रदान
पुणे : Chief Engineer Rajendra Pawar | ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या वतीने महावितरणच्या पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांना राज्यस्तरीय गटात प्रशासकीय उत्कृष्ट ग्राहक सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
कोल्हापूर येथे ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे राज्यस्तरीय दोन दिवसीय अधिवेशन नुकतेच झाले. या अधिवेशनात ग्राहक पंचायतचे राज्य अध्यक्ष डॉ. विजय लाड यांच्याहस्ते राजेंद्र पवार यांना पुरस्काराचे स्मृतिचिन्ह व मानपत्र प्रदान करून गौरविण्यात आले. यावेळी कोल्हापूर ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष प्रवीण खोत, महावितरणचे मुख्य अभियंता स्वप्निल काटकर (कोल्हापूर), ग्राहक पंचायतचे राज्य सचिव अरुण वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती.