Sinhagad Road Pune Crime News | क्लासिक बारमध्ये तोडफोड केल्याने खून झालेल्या गोट्या शेजवळसह चौघांवर गुन्हा दाखल

पुणे : Sinhagad Road Pune Crime News | क्लासिक बारमध्ये वाद घातल्याने बाऊन्सरने डोक्यात हातोडी घालून गोट्या शेजवळ (Gotya Shejwal) याचा खून केला होता. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेअगोदर क्लासिक बारमध्ये ग्राहकांना धमकावून तोडफोड करीत मारहाण केल्याप्रकरणी खून झालेल्या गोट्या शेजवळसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत क्लासिक फॅमिली रेस्टॉरंट अँड बारचा मॅनेजर विकास सुभाष मुरकुटे (वय ३८, रा. वडगाव बुद्रुक) यांनी सिंहगड रोड पोलिसांकडे (Sinhagad Road Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गोट्या शेजवळ, अनिकेत राऊत, अभिषेक, दांगट, रुद्र पाटील यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोट्या ऊर्फ हनुमंत दत्तात्रय शेजवळ (वय ३४, रा. धायरी फाटा) याला गेल्या महिन्यात गोट्या शेजवळ याला पोलिसांनी शहर व जिल्ह्यातून तडीपार केले होते. असे असतानाही तो शुक्रवारी मध्यरात्री सिंहगड रोडवरील क्लासिक बारमध्ये मित्रांसह दारु पिण्यासाठी बसला होता. यावेळी मॅनेजर मुरकुटे सोबत बील देण्यावरुन वादावादी झाली. त्याला बार बाहेर आणण्यात आले. तेथे त्यांच्यात हाणामारी झाली. तेव्हा गणेश कुलकर्णी याने पंक्चरच्या दुकानातील हातोडा घेऊन गोट्या याच्या डोक्यात घातला. त्यात गोट्या याचा मृत्यु झाला. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक करुन चौघांवर खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. (Sinhagad Road Murder Case)
विकास मुरकुटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गोट्या शेजवळ व त्याचे मित्र दारु पित बसले होते. त्यांनी सोबत एक म्युझिक स्पीकर आणला होता. गाणी लावून ते हंगामा करीत होते. रात्री साडेबारा वाजता दुसरा मॅनेजर बिप्लव सरकार याने त्यांना बारचे बाहेर जाण्यास सांगितले. गणेश कुलकर्णी हा गोट्या शेजवळ याला बाहेर घेऊन गेला. त्याचे सोबत अनिकेत देखील गेला. बाहेर गोट्या आणि कुलकर्णी यांच्यात भांडणे सुरु झाली. शेजवळ याने गणेश ला एका स्टीलचा पाण्याचा जग याने मारहाण करुन जखमी केले. यावेळी अभिषेक दांगट व रुद्र पाटील यांनी बारमध्ये हंगामा करुन दारु व बिअरच्या बाटल्या फोडून नुकसान केले. गोट्या हातात एक बिअरची बाटली घेऊन आत आला. त्याने ग्राहकांना बाहेर निघा नाहीतर तुमच्या डोक्यात बाटली घालीन, अशी धमकी दिली. त्यामुळे बारमधील ग्राहक घाबरुन बाहेर निघुन गेले. बारमध्ये तोडफोड करुन धमकी दिल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर बाहेर झालेल्या हाणामारीत गोट्या शेजवळ याचा खून झाला होता. सिंहगड रोड पोलीस तपास करीत आहेत.