Pune Rural Police News | कारमधून होत होती गांजाची वाहतूक ! चौघांना अटक, ४८ लाखाचा गांजा जप्त

पुणे : Pune Rural Police News | जुन्या महामार्गावरुन लोणावळ्याकडे गांजाची वाहतूक (Ganja) करणारी कार पोलिसांनी पकडली. कारमधील चौघांना अटक करुन त्यांच्याकडून ९८ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.
अभिषेक अनिल नागवडे Abhishek Anil Nagwade (वय २४), प्रदिप नारायण नामदास Pradip Narayan Namdas (वय २५), योगेश रमेश लगड Yogesh Ramesh Lagad (वय ३२), वैभव संजीवन चेडे Vaibhav Sanjivan Chede (वय २३, सर्व रा. पी एम टी बस स्टॉपजवळ, कारेगाव ता. शिरुर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कामशेत पोलीस ठाण्याचे (Kamshet Police Station) पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील (PI Ravindra Patil) यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, माजे हद्दीतून जुन्या महामार्गाने एका कारमधून गांजा वाहतूक केली जाणार आहे. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक (Satya Sai Karthik IPS) यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे दोन पथके तयार करुन सापळा लावला. बातमीप्रमाणे वेरना कार ताजे गावाकडे जात असल्याचे दिसताच पोलिसांनी छापा घातला. कारची व डिकीची पाहणी केली असता डिकीमध्ये ९८ किलो गांजा आढळून आला.
पोलिसांनी ४८ लाख ५० हजार रुपयांचा ९८ किलो गांजा, ४२ हजार रुपयांचे ३ मोबाईल, ८ लाख रुपयांची वेरना कार असा ५६ लाख ९२ हजार रुपयांचा माल जप्त केला असून कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख (Pankaj Deshmukh IPS), अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे (Addl SP Ramesh Chopde) , सहायक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील, पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण (PSI Shubham Chavan), सहायक फौजदार नितेश कदम, पोलीस अंमलदार रवींद्र रावळ, जितेंद्र दीक्षित, समीर करे, रवींद्र राय, गणेश तावरे, प्रतिक काळे, गणेश ठाकुर, शिवाजी टकले, सचिन निंबाळकर, पवन डोईफोडे, होमगार्ड सुशिल लोखंडे, रामदास पोटफोडे यांनी केली आहे.