Wakad Pune Crime News | स्पाच्या नावाखाली वेश्या व्यवसाय ! वाकड येथील स्पा लाईट स्पावर छापा, मालक, मॅनेजरला अटक

23rd August 2024

पुणे : Wakad Pune Crime News | स्पाच्या नावाखाली (Spa Center In Wakad Pune) वेश्या व्यवसाय करणार्‍या (Prostitution Racket) वाकड येथील स्पा लाईट स्पावर छापा टाकून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

मॅनेजर विशाल लहू बल्लाळ (वय २४, रा. डांगे चौक, वाकड) आणि मालक अजित गोरख घोलप (वय ३५, रा. चौधरवाडी, फलटण, सातारा) अशी दोघांची नावे आहेत. (Pimpri Chinchwad Crime Branch)

याबाबत अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे (Pimpri Chinchwad AHTU) पोलीस हवालदार मारुती महादेव करचुंडे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांना माहिती मिळाली की, स्पा लाईट स्पाचा मालक अजित घोलप हा स्पामध्ये पैशांचे अमिष दाखवून मुलींकडून वेश्या व्यवसाय करवून घेत आहे. या बातमीची खात्री करण्यासाठी पोलिसांनी एक बनावट ग्राहक तयार करुन त्याला वेश्यागमनासाठी पाठविले. त्यानुसार बनावट ग्राहकाने पोलीस हवालदार शिरसाट यांच्या मोबाईलवर मिस कॉल देऊन इशारा दिला. त्यानंतर पोलिसांनी छापा घातला. तेव्हा मॅनेजर विशाल बल्ल्याळ हा मुलीकडून वेश्या व्यवसाय करुन घेताना आढळून आला. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. पोलीस निरीक्षक पद्मभूषण गायकवाड (PI Padmabhushan Gaikwad) अधिक तपास करीत आहेत.