Pune Pimpri Chinchwad Crime News | दुकानदारास मारहाण करुन लुटणार्या गुंडांना अटक; दगडफेक करुन दोन कारच्या काचा फोडल्या

पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | दुकानात शिरुन दोघा गुंडांनी दुकानदाराच्या शिखातील पैसे जबरदस्तीने (Robbery Case) काढून घेतले. जाताना त्यांना मारहाण करुन दगडफेक करुन दोन कारच्या काचा फोडून दहशत निर्माण केली. वाकड पोलिसांनी (Wakad Police Station) दोघांना अटक केली आहे.
शंतनु गायकवाड (वय २२, रा. किनारा कॉलनी, रहाटणी) आणि ऋषिकेश यादव (वय २२, रा. रहाटणी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत ताहीर जमील हसन (वय ४६, रा. विनायकनगर, सांगवी) यांनी वाकड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. रहाटणी येथील नखाते पेट्रोल पंपाजवळ त्यांचे ए वन फुटवेअर धमाका सेल या नावाचे चप्पल, शुज विक्रीचे दुकान आहे. २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी सव्वा सात वाजता शंतनु गायकवाड व ऋषिकेश यादव दुकानात आले.
कामगारांना शिवीगाळ करुन दमदाटी करु लागले. दुकानातील चप्पला, शुज फेकून सामान अस्ताव्यस्त केले. दोघांनी ७०० रुपयांचे चप्पलचे दोन जोड, ५०० रुपयांचा शुजचा एक जोड जबरदस्तीने घेतला. फिर्यादी यांच्या शर्टच्या वरच्या खिशातील दीड हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. आमच्याविरुद्ध पोलिसात तक्रार केली तर तुम्हाला सोडणार अशी धमकी दिली. दुकानाच्या बाहेर जाऊन सिमेंटचे गट्टू उचलून फिर्यादीच्या दिशेने फेकून मारले. त्यांनी हे दगड चुकविल्याने मागे पार्क केलेल्या दोन कारच्या काचा फुटून नुकसान झाले. या दोघांच्या दहशतीमुळे कोणी मध्ये आले नाही. बाजूच्या दुकानदारांनी भितीने दुकाने बंद केली. पोलिसांनी दोघांना अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक सचिन चव्हाण तपास करीत आहेत.