Hinjewadi Pune Crime News | 14 वर्षाच्या मुलीवर तीन महिने वारंवार बलात्कार; टेम्पोचालकाला अटक, वाल्हेकर वाडीमधील घटना

23rd August 2024

पिंपरी : Hinjewadi Pune Crime News | टेम्पोचालकाने एका १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर तीन महिने वारंवार बलात्कार केला (Minor Girl Rape Case). त्यातून ही मुलगी गर्भवती राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला. हिंजवडी पोलिसांनी (Hinjewadi Police Station) या टेम्पोचालकाला अटक केली आहे.

कार्तिक ऊर्फ मंगेश कांबळे Kartik alias Mangesh Kamble (वय २३, रा. ढमाले वस्ती, कासारसाई) असे त्याचे नाव आहे. याबाबत या मुलीच्या आईने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार कासारसाई, चिंचवडमधील वाल्हेकरवाडी येथे एप्रिल २०२४ ते जून २०२४ दरम्यान घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असताना कांबळे याने तिच्यासोबत शारिरीक संबंध ठेवले. याबाबत कोणास काही सांगितले तर तुला तुझ्या घरच्यांना जीवे मारुन टाकीन व आपल्या दोघात जे झाले आहे ते मी तुझ्या मित्र मैत्रिणींना सांगून तु फालतु आहेस, अशी बदनामी करेल, अशी धमकी दिली. त्यामुळे घाबरुन या मुलीने कोणाला हा प्रकार सांगितला नाही. त्यामुळे त्याने वारंवार यामुलीला घेऊन जाऊन टेम्पोमध्ये तिच्यावर बलात्कार केला. त्यात ही मुलगी गर्भवती राहिल्याने हा प्रकार समोर आला. पोलिसांनी त्याला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक तुकाराम शेळके (PSI Tukaram Shelke) तपास करीत आहेत.