Amol Balwadkar Foundation | अमोल बालवडकर फाऊंडेशन आयोजित भव्य दहीहंडी उत्सव सोहळ्यात समस्त पुणेकर आणि कोथरूडकरांच्या वतीने स्वप्नील कुसळेचा जाहीर सत्कार होणार; अभिनेत्री दिशा पटानी देखील उपस्थित राहणार

पुणे : Amol Balwadkar Foundation | मंगळवार दि. २७ ऑगस्ट रोजी सायं. ०५ वाजता बालेवाडी हायस्ट्रीट ग्राऊंड येथे अमोल बालवडकर फाऊंडेशन आयोजित भव्य दहीहंडी (Dahi Handi 2024) उत्सव मोठ्या जल्लोषात संपन्न होणार आहे.

यावेळी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आपल्या देशाची मान उंचावणारा सुस- म्हाळुंगे परिसरातील खेळाडू स्वप्नील कुसळे (Swapnil Kusale) याने ५० मी. रायफल शूटिंग स्पर्धेत भारताला कांस्यपदक मिळवून दिल्याबद्दल त्याचा समस्त पुणेकर आणि कोथरूडकरांच्या वतीने जाहीर सत्कार या ठिकाणी करण्यात येणार आहे.

तसेच या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे यावेळी सुप्रसिध्द बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani) देखील उपस्थित राहणार आहे. तरी या दहीहंडी उत्सवाला सर्व बालगोपाळांनी आणि विविध मंडळांनी उपस्थित राहून थरावर थर रचत सोहळ्याची रंगत वाढवावी ही विनंती.