Pune Pimpri Chinchwad Crime News | दगडाने डोक्यात मारुन खून करुन मृतदेह इंद्रायणी नदीत टाकला

murder-logo
22nd August 2024

पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | इंद्रायणी नदीपात्रात (Indrayani river) सापडलेल्या मृतदेहाचा खून झाला असल्याचे निष्पन्न झाले आहे (Murder Case). दगडाचे सहाय्याने डोक्यात आणि तोंडांवरमारुन एकाचा खून केला व पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह नदीपात्रात टाकल्याचे स्पष्ट झाले.

याबाबत पोलीस उपनिरीक्षक दीपक सयाजी रहाणे यांनी दिघी पोलीस ठाण्यात (Dighi Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिघी येथील इंद्रायणीनगर गल्ली नं. ४ चे समोर इंद्रायणी नदीपात्रात बुधवारी दुपारी ३ वाजता एक मृतदेह आढळून आला होता. त्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी तो मृतदेह नदीपात्रातून काढून शवविच्छेदनाला पाठविला. डॉक्टरांनी दगडाने डोक्यात आणि तोंडावर मारल्याने मृत्यु झाल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. खून झालेल्याची अद्याप ओळख पटलेली नाही. मृत्यु पावलेली व्यक्ती साधारण ४० ते ४५ वर्षाची आहे. सहायक पोलीस निरीक्षक भामरे तपास करीत आहेत.