Pune Crime Branch News | अल्पवयीन मुलाकडून वाहनचोरीचे 8 गुन्हे उघडकीस; 5 दुचाकी गाड्या, 3 ऑटो रिक्षा जप्त

पुणे : Pune Crime Branch News | वारजे माळवाडी (Warje Malwadi) येथील एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी पकडले़ त्याच्याकडून चोरलेल्या तब्बल ५ दुचाकी आणि ३ रिक्षा हस्तगत करण्यात आल्या आहेत. त्याने वारजे, कोथरुड, सिंहगड रोड, येरवडा, शिक्रापूर पोलीस ठाण्यातील ८ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. (Vehicle Theft Detection)
शहरात दिवसेंदिवस वाहनचोरीचे प्रमाण वाढत चालले आहे. वाहनचोरीच्या गुन्ह्यांना आळा बसावा, याकरीता विशेष मोहिम राबविण्याची सूचना वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी दिली होती. वाहनचोरीचा समांतर तपास करीत असताना पोलीस अंमलदार साईकुमार कारके यांना त्यांच्या बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की, एका वाहनचोर चोरीचे वाहन घेऊन वारजे माळवाडी येथे थांबलेली आहे. त्यानुसार गुन्हे शाखेचे दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने घटनास्थळी जाऊन मुलाला ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी करता त्याने ८ वाहने चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून ५ दुचाकी व ३ ऑटो रिक्षा असा अडीच लाखांचा माल जप्त केला आहे. (Minor Arrest In Vehicle Theft Case)
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवई यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रविण काळुखे, पोलीस हवालदार बाळु गायकवाड, प्रदीप राठोड, धनंजय ताजणे, गणेश ढगे, पोलीस नाईक रवींद्र लोखंडे, पोलीस अंमलदार साईकुमार कारके, महेश पाटील, श्रीकांत दगडे, शिवाजी सातपुते, नारायण बनकर यांनी केली आहे.