Pune Pimpri Chinchwad Crime News | दीड हजार रुपये न दिल्याने कार्यालयात शिरुन तोडफोड; दहशत माजविणार्‍या दोघांना अटक

Arrested-1-3
21st August 2024

पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | फोन दीड हजार रुपये मागितले असता ते देण्यास नकार दिल्याने दोघांनी कार्यालयात शिरुन साहित्याची तोडफोड करण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चाकण पोलिसांनी (Chakan Police Station) दोघांना अटक केली आहे.

मनोज विनयकांत शर्मा (वय२८, रा. आळंदी फाटा, नाणेकरवाडी, ता. खेड) आणि आशुतोष अर्जुन टिपाले (वय २२, रा. बर्गे वस्ती, कुरुळी, ता. खेड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याबाबत अशोक पुरणसिंग रेबारी (वय ३३, रा. आंबेठाण झिवाईमळा, चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार नाणेकरवाडी येथील रेबारी टेम्पो सर्व्हिस ट्रान्सपोर्ट कार्यालयात रविवारी सकाळी साडेआठ वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे नाणेकरवाडीत रेबारी टेम्पो सर्व्हिस ट्रान्सपोर्टचे कार्यालय आहे. त्यांना मनोज शर्मा याने फोन करुन दीड हजार रुपये मागितले. ते पैसे देण्यास फिर्यादी यांनी नकार दिला. तेव्हा मनोज शर्मा व आशुतोष टिपाले हे रेबारी यांच्या कार्यालयात शिरले. मोठमोठ्याने आरडाओरडा करत परिसरात दहशत निर्माण केली. दीड हजार रुपये द्या अशी मागणी करुन फिर्यादीच्या कार्यालयामधील साहित्याची तोडफोड करुन २५ ते ३० हजार रुपयांचे नुकसान केले. पोलिसांनी दोघांना अटक केली असून पोलीस निरीक्षक घार्गे तपास करीत आहेत.