Pune Crime Branch News | अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्याकडून अडीच लाखांचा गांजा जप्त

पुणे : Pune Crime Branch News | अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या गुन्हेगाराकडून पोलिसांनी अडीच लाख रुपयांचा १२ किलो गांजा जप्त केला आहे.
मोबीन अब्दुल रशीद शेख Mobeen Abdul Rasheed Shaikh (वय ३७, रा. सदर बाजार, सोलापूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थ विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक (API Nitinkumar Naik), पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी (PSI Ramkrishna Dalvi) व त्यांचे सहकारी कोंढवा परिसरात पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार अजिम शेख यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, कोंढवा येथे एक जण गांजा विक्रीकरीता येणार आहे. या माहितीची खात्री करण्यासाठी अंमली पदार्थ विरोधी पथक (Anti Narcotics Cell Pune) घटनास्थळी गेले. रस्त्याच्या कडेला थांबलेल्या मोबीन शेख याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून २ लाख ४० हजार रुपयांचा १२ किलो गांजा आणि मोबाईल असा अडीच लाखांचा माल जप्त केला. कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त सतिश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलीस उपनिरीक्षक रामकृषण दळवी, पोलीस उपनिरीक्षक घुले, पोलीस अंमलदार साहिल शेख, अजीम शेख, योगेश मांढरे, चेतन गायकवाड, संदीप शेळके, संदीप जाधव,नितीन जगदाळे, निलम पाटील यांनी केली आहे.