Hadapsar Pune Crime News | पुणे : अल्पवयीन मुलांनी नामांकित शाळेतील मुलींचे नग्न फोटो तयार करुन केले व्हायरल

16th August 2024

पुणे : Hadapsar Pune Crime News | अल्पवयीन मुलांनी टेलिग्रॅम बॉट या अ‍ॅपद्वारे एका नामांकित शाळेतील तीन मुलींचे नग्न फोटो (Nude Photos) तयार करुन ते सोशल मीडियावर व्हायरल (Viral On Social Media) केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत एका ३६ वर्षाच्या महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी तिघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. हा प्रकार १६ जून ते ३० जून २०२४ दरम्यान घडला होता.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी शाळेत शिकत आहे. एका १६ वर्षाच्या मुलाने त्याच्या मोबाईलमधील टेलिग्रॅम बॉट या अ‍ॅपद्वारे फिर्यादी यांची मुलगी व तिच्या तीन मैत्रिणी यांचे नग्न फोटो तयार केले. ते इतर दोघा अल्पवयीन मुलांच्या इन्स्टाग्रामवर पाठविले. त्यामधील एका फोटो या तिसर्‍या मुलाने त्याच्या मित्राला इन्स्टाग्रामवर पाठविला. तो व्हायरल झाल्याने हा प्रकार समोर आला. पोलिसांनी विनयभंगाचा (Molestation Case) गुन्हा दाखल करुन तिघा मुलांना ताब्यात घेतले आहे. पोलीस निरीक्षक जगदाळे तपास करीत आहेत.