Pune Rural Police News | हार्डवेअरच्या दुकानात चोरी करणारे सराईत आंतरराज्य गुन्हेगार जेरबंद; पाच गुन्हे उघडकीस, 5 लाखांचा माल हस्तगत

Arest

पुणे : Pune Rural Police News | रात्रीच्या वेळी हार्डवेअर, धान्य दुकान फोडून त्यामध्ये चोरी करणार्‍या गुन्हेगारांनी जिल्ह्यात धुमाकुळ घातला होता. हे गुन्हे करताना त्यातील एका ठिकाणी ते सीसीटीव्हीमध्ये कैद (CCTV Footage) झाले. त्यावरुन ग्रामीण पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेने (Pune LCB) दोघा सराईत आंतरराज्य गुन्हेगारांना पकडले. (Pune Crime News)

बनवारी ऊर्फ राजू मोहनलाल मीना (रा. रामलिंग रोड, शिरुर) आणि अक्षय प्रकाश धेंडे (वय २५, रा. बाभुळसर खुर्द, कारेगाव, ता. शिरुर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून पाच गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. दोघांकडून पिकअप गाडी, हार्डवेअर दुकानातील पत्रा, कंपाऊड जाळी, धान्याच गोणी असा ५ लाख ४ हजार ६०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. बनवारी याच्यावर महाराष्ट्र व राजस्थानमध्ये एकूण २० पेक्षा अधिक गुन्हे दाखल असून तो राजस्थानातील हिस्ट्रीशीटर आहे.

शिरुर परिसरात मागील महिन्यात हार्डवेअर दुकानामध्ये चोरी होण्याचे प्रमाण वाढले होते. शिरुर पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल होते. या गुन्ह्यांचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पथकामार्फत चालू होता. यावेळी सीसीटीव्ही तपासण्यात आले. गुन्ह्याची कार्यपद्धतीचा अभ्यास केला. गोपनीय बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की, हे गुन्हे रेकॉर्डवरील (Criminal On Police Record) आरोपी बनवारी याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने केले आहेत. या खात्रीशीर बातमीनुसार बनवारी याच्यावर पाळत ठेवून पोलिसांनी बनवारी आणि धेंडे यांना ताब्यात घेतले. त्याला विश्वासात घेऊन चौकशी केली. त्याने शिरुरमधील दोन हार्डवेअरच्या दुकानात चोरी केल्याचे सांगितले. त्याचबरोबर यवत येथून पिकअप चोरी केली. त्या पिकअपच्या मदतीने शिरुर येथील दुकानातील धान्याच्या गोणी चोरी केल्या, यवत येथे जबरी चोरीचा गुन्हा केल्याची कबुली दिली.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख (IPS Pankaj Deshmukh), अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे (Add SP Ramesh Chopade), उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले (SDPO Prashant Dhole) यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर (PI Avinash Shilimkar), सहायक पोलीस निरीक्षक राहुल गावडे (API Rahul Gavde), पोलीस अंमलदार हवालदार तुषार पंदारे, जर्नाधन शेळके, संजू जाधव, सचिन घाडगे, अजित भुजबळ, अतुल डेरे, राजू मोमीण, योगेश नागरगोजे, सागर धुमाळ, तसेच शिरुर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मुजावर, सहायक फौजदार देशमाने यांनी केली आहे.