Pune ACB Trap Case | महिला सहायक सरकारी वकिल एसीबीच्या जाळ्यात; जप्त कार परत मिळवून देण्यासाठी मागितली लाच

Acb Case

पुणे : Pune ACB Trap Case | गुन्ह्यात जप्त केलेली कार परत मिळवून देण्यासाठी १० हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून महिला सहायक सरकारी वकिलाला रंगेहाथ पकडले. (Pune Bribe Case)

अंजला नलिनी कमालकर नवगिरे Anjala Nalini Kamalkar Navgire (वय ५४) असे या सहायक सरकारी वकिलाचे नाव आहे. तक्रारदार यांचे पतीविरुद्ध जून २०२४ मध्ये हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) गुन्हा दाखल असून त्यामध्ये तक्रारदार यांच्या नावे असलेली मारुती स्विफ्ट कार जप्त करण्यात आली होती. ही जप्त कार परत ताब्यात मिळण्यासाठी तक्रारदार यांनी लष्कर न्यायालयात अर्ज केला होता. न्यायालयाने या अर्जाबाबत म्हणणे सादर करण्याचे आदेश सरकारी वकिलांना दिले होते. तक्रारदार यांनी सहायक सरकारी वकिल अंजला नवगिरे यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. तक्रारदार यांना जप्त गाडी परत मिळवून देण्याकरीता दाखल अर्जाबाबत म्हणणे सादर करण्यासाठी व मदत करण्यासाठी लाच मागितली. या महिलेने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्याची पडताळणी २६ जुलै रोजी करण्यात आली. त्यात नवगिरे हिने तडजोडी अंती १० हजार रुपयांची लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर १४ ऑगस्ट रोजी पुन्हा पडताळणी केली. त्यानंतर लष्कर न्यायालयातील (Pune Lashkar Court) सहायक सरकारी अभियोक्ता कार्यालयात सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून १० हजार रुपये स्वीकारताना नवगिरे हिला पकडण्यात आले.

पोलीस अधीक्षक अमोल तांबे (SP Amol Tambe), अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे (Dr Sheetal Janve) यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून पोलीस निरीक्षक रुपेश जाधव (PI Rupesh Jadhav) तपास करीत आहेत.