Azam Campus Pune | आझम कॅम्पस येथे स्वातंत्र्यदिनी ‘युनिटी इन डायव्हर्सिटी ‘ सांस्कृतिक कार्यक्रम; उलगडणार भारतातील सांस्कृतिक वैविध्य !

पुणे : Azam Campus Pune | महाराष्ट्र कॉस्मोपोलिटन एज्युकेशन सोसायटी (आझम कॅम्पस,पुणे कॅम्प) येथे स्वातंत्र्य दिनी, १५ ऑगस्ट रोजी संस्थेचे अध्यक्ष तसेच ‘डॉ.पी.ए.इनामदार युनिव्हार्सिटी’चे कुलपती डॉ.पी.ए.इनामदार यांच्या हस्ते फंक्शन ग्राउंड येथे सकाळी ८. ३० वाजता ध्वजारोहण करण्यात येणार आहे .त्यानंतर ‘युनिटी इन डायव्हर्सिटी’ संकल्पनेवर आधारित विशेष सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थी,विद्यार्थिनी सादर करणार आहेत.
भारतातील समृद्ध सांस्कृतिक वैविध्य या सांस्कृतिक कार्यक्रमातुन उलगडून दाखविण्यात येणार आहे. त्यात ६ विद्यालयांचे १४२ विद्यार्थी सहभागी होणार आहेत.कार्यक्रमाच्या शेवटी ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ गीतावरील सादरीकरणात उपस्थित सर्व सहभागी होणार आहेत.आझम कॅम्पस परिवारातील शैक्षणिक संस्था असेम्ब्ली हॉल येथे हा सांस्कृतिक कार्यक्रम सकाळी नऊ वाजता सादर करणार आहेत.संस्थेचे सचिव प्रा.इरफान शेख यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.