Pune Crime Branch News | सराईत गुन्हेगारांकडून 2 पिस्टल, 4 काडतुसे हस्तगत; खंडणीविरोधी पथकाची कामगिरी

Anti Extortion Cell Pune

पुणे : Pune Crime Branch News | विक्रीसाठी आलेल्या सराईत गुन्हेगाराला पकडून खंडणी विरोधी पथकाने दोघांकडून २ पिस्टल व ४ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. बॉबी भागवत सुरवसे Bobby Bhagwat Suravse (वय २८, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. (Pistol Seized)

खंडणी विरोधी पथकाकडील (Anti Extortion Cell Pune) अधिकारी व कर्मचारी सोमवारी पेट्रोलिंग करीत असताना पोलीस शिपाई मयूर भोकरे, हवालदार अमोल आवाड यांना बातमीदारांकडून बातमी मिळाली की, मंगळवार पेठेतील कोबंडी पुल येथे एक जण पिस्टल घेऊन थांबला आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संशयिताला पकडले. बॉबी सुरवसे याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे १ देशी पिस्टल व २ जिवंत काडतुसे आढळून आली. त्याला अटक करुन चौकशी केली. त्यात त्याने त्याच्याकडील आणखी एक पिस्टल व २ जिवंत काडतुसे एकाला विकल्याचे सांगितले.

त्यानुसार पोलिसांनी वैभव चंद्रकांत कोलते Vaibhav Chandrakant Kolte (वय ३२, रा. पिसर्वे, ता. पुरंदर) याच्याकडून १ देशी पिस्टल व २ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. दोघांना अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक अभिजित पाटील (API Abhijit Patil) तपास करीत आहेत.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे (IPS Shailesh Balkawade ), पोलीस उपायुक्त निखील पिंगळे (DCP Nikhil Pingle) , सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे (ACP Ganesh Ingle) यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक १ चे पोलीस शाखेचे पोलीस निरीक्षक शैलेश संखे (PI Shailesh Sankhe), सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे (API Vijaykumar Shinde), सहायक पोलीस निरीक्षक अभिजित पाटील, पोलीस अंमलदार मयूर भोकरे, अमोल आवाड, नितीन कांबळे, दुर्योधन गुरव, राजेंद्र लांडगे, सयाजी चव्हाण, प्रफुल्ल चव्हाण, अमर पवार, रवींद्र फुलपगारे, मधुकर, तुपसौंदर, प्रविण ढमाळ, गितांजली जांभुळकर यांनी केली आहे.