Pune ACB Trap Case | दस्त नोंदणी अधिकार्‍यासाठी लाच घेणारा वकिल एसीबीच्या जाळ्यात

ACB Trap News

पुणे : Pune ACB Trap Case | सदनिका खरेदीचा दस्त नोंदणी केल्याचा मोबदला म्हणून दस्त नोंदणी अधिकार्‍याकरीता लाच घेताना एका वकिलाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले. (Pune Bribe Case)

माधव वसंत नाशिककर Madhav Vasant Nashikkar (वय ६१, रा. पद्मावती) असे अटक केलेल्या वकिलाचे नाव आहे. तक्रारदार यांनी त्यांच्या पत्नीच्या नावे सदनिका खरेदी केली होती. त्याची दस्त नोंदणी हवेली दुय्यम निबंधक कार्यालयात केली होती. तक्रारदार यांनी दस्त नोंदणीसाठी आवश्यक असणारी शासकीय फी (स्टॅम्प ड्युटी नोंदणी फी, व डॉक्युमेंट हाताळणी फी) ऑनलाईन जमा केली होती. तसेच दस्त नोंदणी झालेनंतर वकीलाची फि माधव नाशिककर यांना दिलेली होती. नंतर माधव नाशिककर यांनी दस्त नोंदणी केल्याचा मोबदला म्हणून दस्त नोंदणी अधिकारी यांचे करीता वकिलांचे फि व्यतिरिक्त तक्रारदार यांच्याकडे ५ हजार रुपयांची लाचेची मागणी केली.
तक्रारदार यांच्या तक्रारीची पडताळणी केली असता अ‍ॅड.माधव नाशिककर यांनी तक्रारदार यांचे दस्त नोंदणी केल्याचा मोबदला म्हणून दस्त नोंदणी अधिकारी यांचे करीता तडजोडी अंती ३ हजार रुपयांची लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खडकमाळ आळी येथील वनराज रसवंतीगृहासमोर सापळा रचला. तक्रारदाराकडून ३ हजार रुपये स्वीकारताना अ‍ॅड. माधव नाशिककर याला पकडण्यात आले.

पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून पोलीस निरीक्षक वीरनाथ माने तपास करीत आहेत.