ACP Satish Govekar | सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर यांना राष्ट्रपती विशिष्ट सेवा पोलीस पदक जाहीर

पुणे : ACP Satish Govekar | स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला सर्वोत्कृष्ट सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर होत आहे. पुणे पोलीस आयुक्तालया च्या गुन्हे शाखेतील सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर यांना राष्ट्रपती विशिष्ट सेवा पोलीस पदक जाहीर झाले आहे.
सतीश गोवेकर हे पुणे शहर (Pune Police) पोलीस दलात गुन्हे शाखेत सहायक पोलीस आयुक्त म्हणून सध्या कार्यरत आहेत. पोलीस उपनिरीक्षक म्हणून त्यांनी पोलीस सेवेत प्रारंभ केला होता. अनेक महत्वाच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यात त्यांचा महत्वाचा वाटा आहे. अनेक वर्षे त्यांनी गुन्हे शाखेत काम करताना महत्वाच्या गुन्ह्यांची उकल केली आहे.
अतिरिक्त पोलीस महासंचालक चिंरजीव प्रसाद आणि संचालक राजेंद्र डहाळे यांनाही राष्ट्रपती विशिष्ट सेवा पोलीस पदक जाहीर झाले आहे. गुणवत्तापूर्ण सेवेकरीता महाराष्ट्रातील ३९ पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर करण्यात आले आहे.