Hadapsar Pune Crime News | वाहतूक कोंडी करणार्यास थांबविल्याने पोलिसास मारहाण; कारचालकाला अटक, हांडेवाडी चौकातील घटना
पुणे : Hadapsar Pune Crime News | वाहतूक कोंडी सोडवत (Traffic Jam In Pune) असताना अचानक कार पुढे घुसवून आणखी कोंडी करणार्या कारचालकाला वाहतूक पोलिसांनी (Pune Traffic Police) थांबले. त्याचा राग येथून कारचालक व इतरांनी पोलिसाला शिवीगाळ करुन बेदम मारहाण केली. हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police Station) कारचालकाला अटक केली असून इतर दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत वाहतूक पोलीस शिपाई अजिंक्य चंद्रकांत नानगुडे (वय ३४) यांनी हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. मारुती राजाराम माने Maruti Rajaram Mane (वय २२, रा. गोपाळपट्टी, मांजरी) असे अटक केलेल्या कारचालकाचे नाव आहे. दुचाकीस्वार सोनू पाटकर (वय २४, रा. उंड्री) व एका कारचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार हांडेवाडी चौकात शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता घडला होता.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे हांडेवाडी चौकात वाहतूकीचे नियमन करीत होते. त्यावेळी एका कारचालकाने अचानक ट्रॅफिकमध्ये कार घुसवून ट्रॅफिक जॅम केले. त्यामुळे फिर्यादी यांनी चालकास थांबण्याबाबत हाताने इशारा केला. तेव्हा त्या कारचालक मारुती माने याने पोलिसांना शिवीगाळ केली. तेव्हा त्याची गाडी बंद करण्यासाठी चावी काढत असताना त्याने फिर्यादी यांच्या हातावर लोखंडी वस्तूने मारहाण केली. त्यांच्या पोटात लाथ मारली. तसेच त्याच्याबरोबर असलेल्याने शिवीगाळ केली. मारुती इंटिंगाचालक व सोनु पाटकर यांच्या वाहनांवर पावती केल्याच्या रागातून त्यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ केली. पोलीस उपनिरीक्षक पवार तपास करीत आहेत.