Death Threat To Ajit Pawar | जीवाला धोका असल्याने अजित पवारांच्या सुरक्षेत वाढ; मंत्र्याच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

धुळे : Death Threat To Ajit Pawar | राज्यात काही महिन्यातच आगामी विधानसभेच्या निवडणुका (Maharashtra Assembly Election 2024) होणार आहेत. नोव्हेंबर महिन्यात निवडणुका होऊ शकतात अशा चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर आता राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. नेत्यांचे दौरेही वाढले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गटांनी यात्रा सुरू केल्या आहेत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने सनसन्मान यात्रा सुरू केली आहे, तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने (Sharad Pawar NCP) शिवस्वराज्य यात्रा सुरू केली आहे.

अशातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जीवे मारण्याची धमकी आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुळ्यात जनसन्मान यात्रा आहे. याआधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धमकी आल्याचे समोर आले. प्रशासनाने धुळे दौऱ्यात त्यांच्या सुरक्षेत मोठी वाढ केली आहे.

धुळे दौऱ्यात विशेष काळजी घेण्याच्या गुप्त वार्ता विभागाच्या पोलिसांना मिळाल्या आहेत. या सूचनेनंतर पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. गुप्तवार्ता विभागाच्या सूचनेनंतर पोलिसांनी अजित पवारांची सुरक्षा वाढवली आहे.

या धमकीवर बोलताना मंत्री अनिल पाटील म्हणाले, “जनतेचा सेवक असल्या कारणाने अजित पवार जनतेमध्ये जाऊन काम करत असतात. त्यातच अजित पवार यांना जिवे मारण्याची धमकी आली आहे. मात्र आम्ही अशा धमक्यांना भीक घालत नाही किंवा त्याची चिंताही करत नाही. जनतेचा सन्मान करण्यासाठी आमची ही यात्रा सुरु राहील”, असंही पाटील म्हणाले.