DCP Nikhil Pingle | निखिल पिंगळे यांची गुन्हे शाखेच्या उपायुक्तपदी नियुक्ती; DCP अमोल झेंडे यांच्याकडे वाहतूक शाखेचा पदभार

Nikhil Pingle-Amol Zende

पुणे : DCP Nikhil Pingle | पोलीस आयुक्त अमितेश कुमार (IPS Amitesh Kumar) यांनी पोलीस उपायुक्तांच्या अंतर्गत बदल्या केल्या आहेत. निखिल पिंगळे यांची गुन्हे शाखेच्या (Pune Crime Branch) पोलीस उपायुक्तपदी नियुक्ती केली आहे. तर गुन्हे शाखेचे अमोल झेंडे (DCP Amol Zende) यांच्याकडे वाहतूक शाखेचा (Pune Traffic Police Branch) कार्यभार देण्यात आला आहे.

निखिल पिंगळे हे २०१४ च्या बॅचचे आयपीएस आहेत. ते गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक होते. त्यांची नुकतीच पुणे शहर पोलीस दलात बदली झाली होती. त्यांच्याकडे आता गुन्हे शाखेचा कार्यभार देण्यात आला आहे.