Swargate Pune Crime News | अण्णाभाऊ साठे जयंतीदिनी DJ लावून ध्वनी प्रदुषण करणाऱ्या मंडळांवर गुन्हा दाखल

पुणे : Swargate Pune Crime News | साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती (Anna Bhau Sathe Jayanti) उत्सव साजरा करताना मोठमोठ्या आवाजात डी जे साऊंडचा वापर करुन ध्वनी प्रदुषण करणार्या मंडळावर पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे.
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव २०२४ या कार्यक्रमाचे अध्यक्ष सदाशिव ढावरे, राहुल खुडे आणि डी जे चालकावर स्वारगेट पोलिसांनी (Swargate Police Station) गुन्हा दाखल केला आहे. या मंडळाच्या मिरवणुकीतील डी जे चा आवाज तब्बल १०८.३ डेसिबल इतका होता.
याबाबत पोलीस अंमलदार सागर काळे यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. स्वारगेट पोलिसांनी वेळोवेळी बैठका घेऊन उत्सवामध्ये साऊंड बॉक्स मर्यादित ठेवणे व आवाज मर्यादित ठेवणे अशा सूचना मंडळांना दिल्या होत्या. सदाशिव ढावरे अध्यक्ष असलेल्या मिरवणुकीत डी जे साऊंडचा वापर करुन कर्ण कर्कश आवाजात गाणी वाजविली जात होती. त्यांना पोलिसांनी आवाज कमी करण्यास सांगितल्यावरही त्यांनी त्यास नकार दिला. सांगूनही आवाज कमी करत नसल्याने पोलिसांनी सायंकाळी साडेसहा वाजता नॉईज लेव्हल मीटर मशीनच्या सहाय्याने डी जेच्या ध्वनी तीव्रता मोजली. ती तब्बल १०८.३ डेसिबल इतकी होती. ध्वनी प्रदुषण मर्यादा ओलडल्याने या मंडळाचे अध्यक्ष व इतरांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक पूनम पाटील (PSI Poonam Patil) तपास करीत आहेत.