Pune Traffic Updates | पुणे विद्यापीठ चौकातून जाणार्या वाहनचालकांना दिलासा ! विद्यापीठ चौकातून सिमला ऑफीस चौकात येण्यास परवानगी

पुणे : Pune Traffic Updates | हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो रेल्वेचे (Hinjewadi To Shivaji Nagar Metro) बांधकाम सुरु असल्याने गणेशखिंड रोडचा (Ganesh Khind Road) वापर करणार्या वाहनचालकांना गेली काही वर्षे मनस्ताप सहन करावा लागत आहे. वाहनचालकांना आता त्यातून थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
गणेशखिंड रोडवरील पुणे विद्यापीठ चौकातील (Pune University Chowk) दुहेरी उड्डाणपुल तसेच वाटेतील मेट्रो स्टेशनची सुरु असलेली कामे यामुळे पुणे विद्यापीठ चौकामधून रेंजहिल्स चौकापासून (Ranghills Chowk Pune) पुढे शिवाजीनगरकडे येण्यासाठी गणेशखिंड रोडवरुन सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद केला होता. शिवाजीनगरकडे जाण्यासाठी वाहनचालकांना रेंजहिल्सला वळसा घालून जावे लागत होते. या मार्गावरील महत्वाची कामे पूर्ण झाल्याने आता हा मार्ग पुन्हा दुहेरी करण्याचा निर्णय वाहतूक शाखेने घेतला आहे.
गणेशखिंड रोडवर पुणे विद्यापीठ चौकामधून सिमला ऑफिस चौक (Shimla Office Chowk) दरम्यान सर्व प्रकारच्या वाहनांसाठी १० ऑगस्ट पासून दुहेरी वाहतूक सुरु करण्यात येत आहे. असा आदेश वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार (DCP Rohidas Pawar) यांनी काढला आहे. यामुळे आता वाहनचालकांचा लांबचा वळसा वाचणार आहे.