Kalyani Nagar Porsche Car Accident Pune | पोर्शे कार अपघात प्रकरणात डॉ. हळनोरने विद्यार्थ्याकडे ठेवली अडीच लाखांची रोकड, न्यायालयात माहिती
पुणे : Kalyani Nagar Porsche Car Accident Pune | कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरणातील मुलाच्या रक्ताचा नमुना बदलण्यासाठी (Blood Sample Tampering Case) डॉ. श्रीहरी हळनोरने (Dr Shrihari Halnor) घेतलेले पैसे महाविद्यालयातील एका विद्यार्थ्याकडे ठेवण्यासाठी दिले होते. डॉ. अजय तावरे (Dr Ajay Taware) यांच्यामुळे मला ते पैसे मिळाले आहेत. माझ्याकडे कपाट नसल्याने तुझ्याकडे ठेव. मी १५ दिवसांनंतर तुझ्याकडून घेईन, असे डॉ. हळनोरने सांगितले होते. असे त्या विद्यार्थ्याने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हंटले आहे. अशी माहिती विशेष सरकारी वकील शिशिर हिरे (Adv Shishir Hire) यांनी न्यायालयात दिली.
विशेष न्यायाधीश यू. एम. मुधोळकर (Judge U. M. Mudholkar) यांच्या न्यायालयासमोर शुक्रवारी पोर्श कार अपघात प्रकरणाची सुनावणी झाली. डॉ. हळनोरने बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयातील एका विद्यार्थ्यांकडे ते पैसे ठेवण्यास दिले. त्यावेळी विद्यार्थ्याने विचारले असता, डॉ. हळनोरने ‘नंतर सांगतो काळजी करू नको. काही चुकीचे केलेले नाही,’ असे सांगत विद्यार्थ्यांकडे अडीच लाखांची रोकड दिली. त्यानंतर विद्यार्थाने ती कपाटात ठेवून दिली, ही बाब ऍड. हिरे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली.
अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हळनोर, विशाल अगरवाल, शिवानी अगरवाल, अमर गायकवाड आणि अश्पाक मकानदार येरवडा कारागृहात (Yerawada Jail) आहेत. त्यांनी जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. सरकारी पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील म्हणून शिशिर हिरे युक्तिवाद करीत आहेत. त्यांना ऍड. सारथी पानसरे साहाय्य करीत आहेत.
युक्तिवादादरम्यान ऍड. हिरे म्हणाले, अपघाताच्या दिवशी प्रत्यक्षदर्शी च्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलाला अपघातग्रस्त पोर्शे गाडीमधून बाहेर काढले तेव्हा तो उभे राहण्याच्या स्थितीत नव्हता. मात्र डॉ. हळनोरने तो मुलगा मद्याच्या अमलाखाली नव्हता असे अहवालात नमूद केले आहे.
ससून रुग्णालयातील डीव्हीआर मध्ये डॉ. हळनोर, अल्पवयीन मुलगा, शिवानी अगरवाल, त्याचे वडील, साक्षीदार महिला उपस्थित असल्याचे स्पष्ट दिसून आले आहे. अल्पवयीन मुलाऐवजी समान रक्तगट असलेल्या विशाल अगरवाल याच्या मित्राचे ते रक्त असल्याचे स्पष्ट झाले आहे.
प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरने दिलेल्या जबाबानुसार, डॉ. हळनोरने मुलाच्या आईचे रक्त घेण्यास सांगितले होते. रक्ताची अदलाबदल डॉ. तावरे आणि विशाल अगरवाल यांच्या सांगण्यानुसार करण्यात आली, असे हिरे यांनी न्यायालयास सांगितले.