Amit Shah On Maharashtra Tour | अमित शहा तीन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर; आगामी विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरवणार

मुंबई : Amit Shah On Maharashtra Tour | आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे नुकतेच तीन दिवसीय दिल्ली दौरा करून महाराष्ट्रात परतले आहेत तर दुसरीकडे अमित शहा तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. भाजपला राज्यात लोकसभेला मिळालेल्या कमी प्रतिसादाबाबत चिंतन आणि मनन करण्यासाठी भाजपकडून मागेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यात अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. या अधिवेशनाला हजारो पदाधिकारी उपस्थित होते. मंंडल प्रमुखापासून ते राज्याच्या प्रदेश पातळीवरील पदाधिकाऱ्यांंना या अधिवेशनात मार्गदर्शन करण्यात आले.
आता पुन्हा शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. १६, १७ आणि १८ ऑगस्टला शहा राज्याच्या दौऱ्यावर असतील. या दौऱ्यात ते विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून पक्षाच्या महत्वाच्या बैठका घेणार आहेत. प्रत्येक विभागातील राजकीय परिस्थितीचा आढावा ते घेणार आहेत. यावेळी आगामी विधानसभेची रणनीती ठरवण्यात येईल अशी माहिती आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती, महाविकास आघाडीच्या बैठकींचा धडाका सुरु आहे. नुकतीच वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत महायुतीची (Mahayuti) बैठक पार पडली. तर दुसरीकडे महाविकास आघाडीची समन्वय बैठकही पार पडली. आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) असा थेट सामना विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळणार आहे.
महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा येत्या १६ ऑगस्टला होणार आहे तर महायुती २० ऑगस्ट पासून प्रचाराचा नारळ फोडणार आहे.